Home > मॅक्स रिपोर्ट > मूल दत्तक घेण्यासाठी काय आहेत अटी ?

मूल दत्तक घेण्यासाठी काय आहेत अटी ?

अनेकांना मूल दत्तक घ्यायचं असतं. पण त्यासंदर्भात नेमक्या अटी काय आहेत? हे माहिती नसतं. त्यामुळे या अटी जाणून घेण्यासाठी पाहा विद्याधर प्रभुदेसाई यांचे मार्गदर्शन...

मूल दत्तक घेण्यासाठी काय आहेत अटी ?
X

दोन वर्षांपर्यंतचं मूल दत्तक घेण्यासाठी दाम्पत्याचं संमिश्र वय (Composite Age) 85 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये किंवा एकल पालक (Single parent) 40 वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.

दोन ते चार वर्षांपर्यंतचं मूल दत्तक घेण्यासाठी दाम्पत्याचं संमिश्र वय 90 वर्षांपेक्षा अधिक असता कामा नये किंवा एकल पालक (Single parent) 45 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.

चार ते आठ वर्षांपर्यंतचं मूल 100 संमिश्र वर्षांपर्यंतचं (Composite Age) दाम्पत्यही दत्तक घेऊ शकतं किंवा एकल पालक (Single parent) 50 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये.

आठ ते अठरा मूल 110 संमिश्र वर्षांपर्यंतचं (Composite Age) दाम्पत्यही दत्तक घेऊ शकतं किंवा एकल पालक (Single parent) 55 वर्षे.

५५ वर्षांवरील एकल पालक मूल दत्तक घेऊ शकत नाहीत.

स्वतःची चार किंवा अधिक मुलं असलेल्या दाम्पत्यांना मूल दत्तक घेता येणार नाही.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live in relationship) राहणाऱ्या दाम्पत्यांना मूल दत्तक दिलं जात नाही.

ज्यांना एकही मूल नाही अशा दाम्पत्यांना मूल दत्तक देण्यास प्राधान्य दिलं जातं.

दोन किंवा अधिक मुले असलेली जोडपी केवळ विशेष गरजा असलेल्या मुलांना दत्तक घेण्यास पात्र आहेत.

संभाव्य दत्तक पालकांना त्यांचे वास्तव्य असलेले राज्य व्यतिरिक्त दोन राज्य निवडी दिल्या जातात किंवा ते त्यांच्या ओळखीनुसार राज्यांचा एक समूह (Cluster) निवडू शकतात.

अर्ज करणाऱ्या दाम्पत्याच्या माहितीची सत्यता पोलीस अधीक्षक कार्यालयाद्वारे तपासली जाते.

अर्ज करणाऱ्यांच्या घराची पाहणी (Home study) केली जाते.

मूल दत्तक दिल्यानंतर 2 वर्षांपर्यंत त्या घराचा दौरा (Post Adoption Home visit) करून वेळोवेळी फॉलोअप रिपोर्ट तयार केला जातो.

मूल दत्तक घ्यायचे म्हणजे पैसे, प्रॉपर्टी लिहून द्यावी लागेल का? असे प्रश्न अनेकांना पडतात. परतू, सरकारकडून पैशाच्या व्यवहाराबाबत असी कोणतीही चर्चा झालेली नाही. एवढेच नाही तर दत्तक पालकांना नियमानुसार कोणतेही बॉण्ड घेण्यास किंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक करण्यास सांगितले जाऊ शकत नाही. पण हो, याचा अर्थ असा नाही की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असण्याची गरज नाही. मुलाची जबाबदारी घेण्यासाठी स्वत:ला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम करा. त्यानंतर मूल दत्तक घेण्यास पुढे जा.

Updated : 28 Aug 2023 4:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top