Home > मॅक्स रिपोर्ट > Max Maharashtra Impact : वाळीत टाकलेल्या कुटुंबांना न्याय, पोलिसांनी दखल घेऊन मिटवला वाद

Max Maharashtra Impact : वाळीत टाकलेल्या कुटुंबांना न्याय, पोलिसांनी दखल घेऊन मिटवला वाद

Max Maharashtra Impact  : वाळीत टाकलेल्या कुटुंबांना न्याय, पोलिसांनी दखल घेऊन मिटवला वाद
X

रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर येथे कोळी समाजातील कुटुंबावर जाती अंतर्गत सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गेली सात महिने कोळी समाजातील देवेंद्र कोळी व त्यांच्या तीन कुटुंबांवर कोळी गावकमिटीने सामाजिक बहिष्कार टाकला होता. यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रने हे प्रकरण सर्वांसमोर आणले. त्यानंतर रायगडसह राज्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पीडित कुटूंबांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला.

मॅक्समहाराष्ट्रच्या बातमीची दखल प्रशासनानेही घेतली, वाळीत टाकलेले कुटुंब व गावकमिटी यांच्यासमवेत प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी विभा चव्हाण, पेणचे तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, पांडुरंग पुरुषोत्तम पाटील, संदीप ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. प्रशासनाच्या मध्यस्तीने गाव पंचकमिटीला महत्वपूर्ण व कायदेशीर सूचना देण्यात आल्या. त्यानंतर गावातील तणाव आता निवळला आहे. इते ऐक्य व सलोख्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

Updated : 2021-11-25T16:41:07+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top