पाकिस्तानमधील सर्व एफ -16 विमान सुरक्षित, भारताचा ‘तो’ दावा खोटा ठरण्याची शक्यता?
X
अमेरिकेतील ‘फॉरेन पॉलिसी मैगजीन’ने एक अहवाल सादर केला असून या अहवालात अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने पाकिस्तानात सर्व एफ – 16 विमान सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारताने फेब्रुवारी दरम्यान पाकिस्तानचे एफ-16 हे विमान पाडल्याचा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात बालाकोट एअर स्ट्राईकनंतर भारताने पाकिस्तानचे एफ- 16 हे विमान पाडल्याचा दावा केला होता. पाकिस्तानच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी ‘फॉरेन पॉलिसी मैगजीन’ ला ही माहिती दिल्याचं वृत्त 5 एप्रिलला प्रसिद्ध झालं असून अमेरिकेच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पाकिस्तान मधील सर्व एफ – 16 विमान सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे.
भारताने 27 फेब्रुवारीला पाकिस्तानशी झालेल्या संघर्षात पाकिस्ताचे एफ – 16 हे लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला होता. ‘फॉरेन पॉलिसी मैगजीन’ च्या या अहवालाने भारताचा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे. मात्र, भारताने 28 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या एफ-16 द्वारे एएमआरएएएम मिसाइलचा वापर केल्याचे तुकडे जगाला दाखवले होते. या तुकड्यावरुन हे स्पष्ट करण्यात आले होते की, पाकिस्तानने भारतीय सैन्यांवर हल्ला करण्यासाठी अमेरिकन बनावटीचे एफ-16 हे विमान वापरले. अमेरिकेने हे विमान पाकिस्तानला कोणत्याही सैनिकी कारवाईमध्ये वापरण्यासाठी दिले नव्हते. त्यामुळे अमेरिकेने पाकिस्तानला या संदर्भात विचारणा केली असता पाकिस्तानने अमेरिकेच्या अधिकाऱ्यांना पाकिस्तान मधील सर्व एफ -16 सुरक्षित असल्याचे सांगितले होते. तसेच हे एफ – 16 पाहण्यासाठी अधिकाऱ्यांना आमंत्रित देखील केले होते. त्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ‘फॉरेन पॉलिसी मैगजीन’ने पाकिस्तान मधील सर्व एफ-16 सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानचे एफ -16 विमान पाडल्याचा दावा खोटा ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान या संदर्भात अमेरिकेच्या संरक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. तसंच भारताच्या वतीनं देखील या संदर्भात कोणतीही प्रतिक्रिय़ा देण्यात आली आहे.
दरम्यान ‘फॉरेन पॉलिसी मैगजीन’च्या अहवालाने बालाकोट स्ट्राईकनंतर भारत पाकिस्तानला नुकसान पोहोचवण्यात अपयशी ठरल्याचं मत एमआयटीचे प्राध्यापक विपिन नारंग यांनी व्यक्त केले आहे. भारत पाक संघर्षात भारताचे एक विमान आणि हेलिकॉफ्टर खराब झाले होते. त्यामुळे भारताचं यामध्ये नुकसान झालं असल्याचं मत विपिन रावत यांनी एका खासगी वृत्तपत्राशी बोलताना व्य़क्त केले आहे.