Home > मॅक्स रिपोर्ट > चौधरी चरणसिंह यांची कर्मभूमी बागपत मध्ये काय आहे राजकीय गणितं?

चौधरी चरणसिंह यांची कर्मभूमी बागपत मध्ये काय आहे राजकीय गणितं?

काय आहे स्थिती चौधरी चरणसिंह यांच्या बागपत जिल्ह्यात काय आहे राजकीय गणित? भाजपची डोकेदुखी वाढवणाऱ्या आरएलडीच्या बालेकिल्ल्यात वाचा मॅक्समहाराष्ट्रचा स्पेशल रिपोर्ट

चौधरी चरणसिंह यांची कर्मभूमी बागपत मध्ये काय आहे राजकीय गणितं?
X

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनी ज्या बागपत जिल्ह्याचे नेतृत्व करत देशाचं पंतप्रधान पद मिळवलं. त्या जिल्ह्यांमध्ये 2022 मध्ये निवडणूकीची गणित काय आहेत? हे जाणून घेण्यासाठी मॅक्समहाराष्ट्रची टीम बागपत जिल्ह्यात पोहोचली.

2022 च्या निवडणूकीत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि राष्ट्रीय लोक दल पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू जयंत सिंह चौधरी यांनी गटबंधन केल्याने भाजप चं गणित बिघडल्याची चर्चा आहे.

साधारणपणे अखिलेश यादव यांच्या मागे मुस्लीम आणि यादव यांची पक्की वोट बॅंक असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलं आहे. तर आरएलडीच्या जयंत चौधरी हे जाट समाजाचे नेते म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्या मागे जाट समाज उभं राहताना पाहायला मिळाला आहे. मात्र, 2013 सासू झालेल्या मुझफ्फर दंगलीने हा समाज भाजपसोबत गेला. 2013 मध्ये मुझफ्फर मध्ये झालेल्या या दंगलीने राजकीय गणित बदललं आहे.

मात्र, दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाने जाट समाज पुन्हा एकदा भाजपच्या विरोधात गेल्याचं बोललं जात आहे. मात्र, ग्राउंड झिरोवर शेतकरी आंदोलनाची फारशी चर्चा होताना दिसत नाही.

जाट आणि मुस्लिम समाज एकत्र आला तर भाजपचं गणित बिघडणार का?

पश्चिम उत्तर प्रदेश मध्ये मुस्लिम समाजाची 27 टक्के मतं आहेत. जाट समाजाची 12 ते 15 टक्के मतं आहेत. मुस्लिम समाजाची बहुतांश मतं सपाच्या मागे उभे राहण्याची शक्यता आहे. मात्र, 12 टक्के असलेला जाट समाज जयंत चौधरी यांच्या RLD मागे पुर्णपणे उभा राहताना दिसत नाही. मुझफ्फर दंगलीने दुखावलेला हा समाज भाजप सोबत जोडला गेला आहे. मात्र, चौधरी चरणसिंह आणि अजितसिंह चौधरी यांच्या काळापासून भावनिकदृष्ट्या चौधरी कुटुंबासोबत जोडलेला समाज आजही आहे . तर "जयंत हमारे कलेजा का टुकडा है", असं म्हणत इस बार गटबंधन ची सरकार येणार असं सांगतात.

2012 आणि 2017 मधील मतांची टक्केवारी पाहिली तर सपाच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. मात्र, RLD आणि काँग्रेसच्या मतांमध्ये मोठा फरक पडला आहे. ही मतं भाजपकडे वळल्याचं दिसुन येतं. भाजपकडे गेलेली ही मत पुन्हा आरएलडीकडे येताना आत्तापर्यंत झालेला निवडणूकीत दिसून येत नाही.

RLD चा गड समजल्या जाणाऱ्या बागपत जिल्हामध्ये तीन मतदारसंघ आहेत. बागपत, छपरौली आणि बडौत…

छपरौली विधानसभा

छपरौली विधानसभा मतदारसंघ हा RLD चा गड राहिला आहे. 2017 मध्ये आरएलडीचे उमेदवार सहेंद्र सिंह रमाला या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या सतेंद्र सिंह यांचा पराभव केला होता. तर समाजवादी पक्षाचे मनोज चौधरी तिसऱ्या तर बसपाच्या राजबाला चौधरी चौथ्या क्रमांकावर होत्या. मात्र, आरएलडीच्या तिकिटावर विजय मिळवल्यानंतर सहेंद्र सिंह रमला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकुणच RLD ला 2002 पासून सातत्याने या जागेवर विजय मिळत आहे.

2017 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत बागपत विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार योगेश धामा यांचा विजय झाला होता. त्यांनी समाजवादी पार्टी चे उमेदवार अहमद हमीद यांचा पराभव केला होता. आरएलडीचे उमेदवार करतार सिंह भडाना तिसऱ्या क्रमांकावर होते. या निवडणूकीत नवाब अहमद हमीद यांनी आरएलडीमध्ये प्रवेश केला असून ते आता आरएलडी च्या तिकिटावर बागपतमधून निवडणूक लढत आहेत.

बडौत विधानसभाः

बडौत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार केपी मलिक यांनी विजय मिळवला होता. तर आरएलडीचे साहब सिंह दुसऱ्या क्रमांकावर होते. समाजवादी पक्षाचे शोकेंद्र आणि बसपाचे उमेदवार लोकेश दीक्षित तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते. या मतदार संघात RLD 2012 आणि 2017 ला झालेल्या दोनही विधानसभा निवडणुकांमध्ये जयंत सिंह यांच्या RLD ला विजय मिळवु शकला नाही. 2012 मध्ये बसपा तर, 2017 मध्ये भाजप या जागेवर विजय मिळवला होता.

बागपत जिल्ह्यात जाट, त्यागी, गुर्जर, मुस्लिम, दलित मतांचा प्रभाव आहे. ब्राह्मण मतंही इथे आहेत. जाट आणि मुस्लिमांची युती इथे आरएलडीला विजय मिळवून देत आली आहे. मात्र, 2013 च्या मुझफ्फरनगर दंगलीनंतरदंगलीनंतर या शेजारील जिल्हावरही प्रभाव पडला होता. मात्र यावेळी, शेतकरी आंदोलनाच्या मदतीने जाट-मुस्लिम एका व्यासपीठावर दिसत असून ही एकजूट आणखी मजबूत करण्यासाठी आरएलडीचे जयंत चौधरी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसुन येत आहे.

बागपत मधील भाजप उमेदवार योगेश धामा यांच्या बाबत बोलताना रटोल येथील मुस्लीम समाजातील साधारण 70 वर्षाचे वृद्ध सांगतात, पार्टी उमेदवार अच्छा काम किया है… लेकीन पार्टी अच्छी नही है. बीजेपी यहा क्या कर रही है. विकास कोन नही बाटता, यहा हिंदू मुस्लीम को बाटा जा रहा है.

मैने बीजेपी की सरकार देखी है

अटलजी भी प्रधानमंत्री थे लेकीन ऐसी भाषा नही बोलते..

इसबार युपी मे हिंदू मुस्लीम भाईचारे के जीत होगी.




असुद्दीन ओवैसी यांच्यावर हल्ला झाला. ओवैसी यांच्या बाबत स्थानिक मुस्लीमांचं मत आम्ही जाणून घेतलं असता. मुस्लीम तरूणाने सांगितले, "असुद्दीन ओवैसी का असर कैसे रहेगा? कभी आया है यहा? यहा इनको कोई नही जानता असं उत्तर मुस्लीम युवकाने दिलं."




दोन जाट शेतकऱ्यांना आम्ही जयंत चौधरी बाबत विचारले ते म्हणाले, जयंत हमरे जीगर का तुकडो है. 5 साल से गन्ने के कितने दाब बढाए. देख भाई सिधी बात तन्नू बताऊ हमरा ओट जयंत को जाएगा. जितेगा तो जाट ही…यावर उमेदवार तर मुस्लीम आहे. असं बोलल्यावर ते म्हणाले,भाई म्हारा वोट जाट को जाएगा..याचा अर्थ आरएलडी ने जर मुस्लीम उमेदवार दिला असेल तर जाट त्या उमेदवाराला मत देतील की नाही याबाबत शंका आहे. या ठिकाणी अहमद हमीद उमेदवार आहेत.

भिकोली गावातील लोकांशी आम्ही बातचीत केली….

55 ते 60 वर्षाचा एक माणूस रागात सांगतो, चुनाव आते ही राशन भाषण देने आते है. लेकीन लोग कोरोना की वजय से मर रहे थे. तब आप कहा थे? कोई नही इस बार हमने मन बना लिया है.




बागपत, मधील पुराना कसबा मधील शेतकरी शेतात काम करत होता.

तेथील महिला कामगारांशी आम्ही बातचीत केली. एक महिला शेतात काम करताना म्हणाली,अंगणवाडीतील मुलांना काहीच मिळालं नाही. राशन मध्ये काहीच देत नाही. या राशनाने तुमचं पोट भरेल का?




मुस्लीम समाजातील मजूर महिला तोंडातील पान थुंकवुन बोलते. देखो भाईसाब राशन मिल रहा है. घर बन गया है. और क्या चाहिए? गॅस भी पिछली साल मिली है. सब ठीक है मोदी तो अच्छा है लेकीन ये लोग ज्यो यहा पे सब अनाज नही देते. सब की सब खा जाते है. इस बार हम इनको ओट क्यू दे भला. मोदी के लिए ओट दुंगी लेकीन मोदीजीने इनको हटाना चाहिए..





शेत मालकाला जेव्हा शेती बाबत विचारले तेव्हा ते म्हणाले, ३० किलो मुळा १०० रूपये विकतो. तिकडे शहरात २० ते ३० रूपये किलोने लोक विकत घेता. कुठं जातात मधले पैसे?

चुनाव के समय ही लोग आते है. नेता भी और आप लोग मीडिया वाले भी…

आप बीच मे आते क्यू नही दिखाते हमारी परेशानी?

मोदी और योगी के काल मे किसान की हालत बहोत बेकार है, असं म्हणत यावेळी आम्ही भाजपला मतदान करणार नसल्याचं सांगितले.





दुसरीकडे आम्ही बागपतच्या एका गावात असताना तेथील भाजपचे उमेदवार योगेश धामी यांची वाट पाहात असलेल्या कार्यकर्त्यांशी बातचीत केली. ते म्हणाले




योगेश धामी का काम बोलता है. हम भी जाट है. लेकीन योगी और मोदी जी का काम देखिए…

सडके देखिए

ओ बिजली कौन दिए

रस्ते पे दिन दहाडे गुंडे घुमिए यहा…

फिर से गुंडा राज चाहिए के?, असं म्हणत यावेळी पुन्हा एकदा भाजपला लोकांनी का मतदान करावं याबाबत आमच्याशी संवाद साधला.

एकंदरीत आरएलडीचा गड असलेल्या बागपत जिल्ह्यात काटे की टक्कर असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपला यावेळेला ही निवडणूक सोपी वाटत असताना अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनी निवडणूक रंगतदार केली आहे.

Updated : 9 Feb 2022 3:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top