Home > मॅक्स रिपोर्ट > Ground Report : गारपीट आणि पाऊस, शेती उध्वस्त

Ground Report : गारपीट आणि पाऊस, शेती उध्वस्त

Ground Report : गारपीट आणि पाऊस, शेती उध्वस्त
X

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये जोरदार वादळी वाऱ्याचा, गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये गुरुवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह गारपीट झाली.





यामुळे तासगाव तालुक्यातील पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनेराजुरी, सावळज, सिद्धेवाडी,पेड या भागातील शेतकऱ्यांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून द्राक्ष बागेवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.






तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाच्या महामारीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.त्यात गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्याने द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजाराम सकटे यांनी


Updated : 4 May 2022 10:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top