News Update
Home > मॅक्स रिपोर्ट > रायगडमध्ये अवकाळी पाऊस, आंबा उत्पादकांना फटका

रायगडमध्ये अवकाळी पाऊस, आंबा उत्पादकांना फटका

रायगडमध्ये अवकाळी पाऊस, आंबा उत्पादकांना फटका
X

रायगड: रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. महाडमध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तर घराची भिंत कोसळून एकजण जखमी झाला आहे. काही ठिकाणी तर अचानक आलेल्या पावसाने लग्न मंडपांचेही नुकसान झाले. या पावसाने आंबा, काजू,आणि इतर फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वीटभट्टी व्यवसायिकांचे देखील नुकसान झाले. शासनाने लवकारात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी केली जात आहे. इथल्या परिस्थितीची आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...


Updated : 2022-05-04T15:34:14+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top