Home > मॅक्स रिपोर्ट > केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं?

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं?

1 फेब्रवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अर्थसंकल्प मांडला. यात महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं? महाराष्ट्रासाठी कोणत्या योजना राबवण्यात येणार आहेत आणि कोणते प्रकल्प उभे करण्यात येणार आहेत? या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या हाती किती कोटी रुपये मिळाले? याचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून...

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या पदरात काय पडलं?
X

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण (FM Nirmala Sitaraman) यांनी लोकसभेत (Loksabha) अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी तरतूद केल्याचा दावा शिंदे-फडणवीस (Shinde-FAdnavis) सरकारने केला आहे.

पायाभूत सुविधांसाठीची तरतूद (For infrastructural Development)

  • पुणे मेट्रो- 1 हजार 206 कोटी रुपये
  • मुंबई मेट्रो- 500 कोटी रुपये
  • नागपूर मेट्रो - 118 कोटी रुपये
  • बुलेट ट्रेन - 2 हजार कोटी रुपये
  • रस्ते सुधारणा - 1 हजार कोटी रुपये
  • मुंबईच्या MUTP - 163 कोटी रुपये




राज्याच्या विकासासाठीचे प्रकल्प (For The development of the State)

  • पर्यावरण पूरक नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) - 600 कोटी रुपये
  • विदर्भ-मराठवाडा सिंचन प्रकल्प - 400 कोटी रुपये
  • मुळा मुठा नदी शुध्दीकरण प्रकल्प - 246 कोटी
  • नाग नदी शुध्दीकरण - 224 कोटी
  • ग्रीन मोबीलिटी - 215 कोटी


राज्यातील रेल्वे प्रकल्प (For Railway project)

  • विविध रेल्वे प्रकल्प - 13 हजार 539 कोटी रुपये
  • रेल्वेमार्ग, विस्तार, गेज परिवर्तन असे 6 हजार 142 किमीचे 35 प्रकल्प - 93 हजार 137 कोटी
  • 123 रेल्वे स्थानकांची अमृत भारत योजनेसाठी निवड
  • 18 स्थानकांचे तांत्रिक-आर्थिक सर्वेक्षणाला सुरुवात


केंद्रीय करातून मिळणारा हिस्सा- 36 हजार 524.88 कोटी रुपये



सप्तर्षी योजना (Saptarshi Yojana)

  • सर्वसमावेशक विकास
  • वंचित घटकांना प्राधान्य
  • पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक
  • क्षमता विस्तार
  • हरित विकास
  • युवा शक्ती
  • आर्थिक क्षेत्राचा विकास


या केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला मिळालेल्या निधीबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde on Budget 2023) यांनी म्हटले आहे की, पायाभूत सुविधा, कृषी, रोजगार, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली आहे. देशात पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा महाराष्ट्रातील प्रकल्पांना फायदा होईल. तसेच राज्यात निश्चित सकारात्मक परिणाम दिसून येईल. हा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणारा असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार मानतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रीया देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis comment on Budget 2023) म्हणाले, सर्वजनहिताय असा अर्थसंकल्प दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे आभार मानतो. रेल्वे प्रकल्पासाठी 13 हजार 500 कोटी रुपये आणि अन्य प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद आतापर्यंतची सर्वात मोठी तरतूद असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मध्यमवर्गाला खूश करण्यासाठी आयकरात सूट देण्याचं ढोंग सरकारने केले आहे. याबरोबरच देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याबाबतच्या अक्षमतेचा सरकारने स्वीकार केला आहे. एवढंच नाही तर मध्यमवर्गाच्या आयकरात सूट देण्याची मागणी करणाऱ्या भाजपला मध्यमवर्गीयांना दिलासा देण्यासाठी आठ वर्षे लागल्याचे अजित पवार म्हणाले. (Ajit pawar comment on Budget 2023)

Updated : 16 Feb 2023 4:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top