Home > मॅक्स रिपोर्ट > पंढरपुरात ट्रॅफिक जाम वारकऱ्याचे हाल

पंढरपुरात ट्रॅफिक जाम वारकऱ्याचे हाल

पंढरपुरात ट्रॅफिक जाम वारकऱ्याचे हाल
X

आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याच्या सांगितल्या जात असताना पंढरपुरातून शहराबाहेर जाणाऱ्या रस्त्यावर ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली आहे. मोहोळ पंढरपूर या रस्त्यावर 65 एकरात एस्टी स्टँड बनवले असून याठिकाणी रस्त्याच्या कडेला एस्टी गाड्या पार्क केल्याने ही समस्या निर्माण झाली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पंढरपूर कर्हाड या रस्त्यावर ही ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली असून पंढरपूरच्या बाहेरून काढलेल्या बायपास रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाले आहे. प्रशासनच्या निष्काळजीपणावर वारकऱ्यातून संताप व्यक्त करण्यात येत असून पंढरपूर वरून पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरही ट्रॅफिक ची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर वाहतूक सुरळीत करावे असे वारकऱ्यांचे म्हणणे आहे.

Updated : 11 July 2022 5:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top