Home > मॅक्स रिपोर्ट > टोलचे दर वाढले, वाहनचालक म्हणाले...

टोलचे दर वाढले, वाहनचालक म्हणाले...

टोलचे दर वाढले, वाहनचालक म्हणाले...
X

पेट्रोल, डिझेल चे भाव आधीच वाढलेले असताना त्यात आता टोलचा दर देखील १ ऑक्टोबर पासून वाढणार आहेत. त्यामुळं चारचाकी वाहनाचालक त्रस्त झाले आहेत. छोटी वाहने ५ रुपये तर मोठ्या वाहनांसाठी १० ते १५ रुपये टोल दर वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. महागाईनंतर आता टोल वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. यांसदर्भात मॅक्स महाराष्ट्रने ऐरोली आणि मुलुंड टोल नाक्यावरुन येणाऱ्या वाहनधारकांसोबत संवाद साधला आहे.

भाजपने सत्तेत येण्याआधी 'महाराष्ट्र टोलमुक्त' करू अशी घोषणा केली होती. परंतु, याउलट आता टोल वाढणार असल्याने वाहन धारकांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय. अगोदर महागाई वाढल्याने पेट्रोल, डिझेल चे भाव वाढले आहेत. त्यात आता वाढीव टोल देखील भरावा लागणार असल्यानं वाहनचालक संतप्त झालेत.

दरम्यान एक वाहन चालक म्हणाला "रस्ते खराब आहेत. रोजचं ट्रॅफिक असते. टोल नाक्यावरचं १५ ते २० मिनिटे थांबावं लागतं. मात्र, NSA च्या नियमानुसार १ मिनिटांपेक्षा अधिव जर कोणी थांबत असेल तर त्यांना टोल मोफत व्हायला पाहिजे. तरी टोल माफ होत नाही. टोल वाढलाचं तर आम्हाला धंदा बंद करावा लागेल, तर टोल वाढवणं हे सरकारच्या हातात त्यावर आम्ही काय बोलणारं महागाई वाढत आहे त्यामुळे टोल वाढ परवडणारी नाही. असंही काही वाहनचालकांचं म्हणणं आहे.

मतदान येतं तेव्हा टोल माफी करण्याचं आश्वासन राजकीय पक्षं देतात. तर एकाने रागातचं उत्तर दिलं,” टोल बंद करो. काही लोकांनी म्हटलं आहे की, राज ठाकरे यांना सत्तेत आणा. राज ठाकरे सत्तेत आले तरचं टोल मुक्त महाराष्ट्र होईल, असा विश्वास वाहन चालकांनी व्यक्त केला. तर भाजपकडून टोलमाफीचं फक्त आश्वासन दिलं जातं, अंमलबजावणी केली जात नसल्याचंही काही वाहनचालकांनी सांगितलं.

परंतु आता ज्या पद्धतीने पेट्रोल, डिझेल चे आणि गॅसच्या दर कमी केले आहेत. तसेच टोल मुक्त महाराष्ट्र करावा अशी अपेक्षा अनेकांनी शिंदे-भाजप सरकारकडून व्यक्त केली आहे.


Updated : 17 Sep 2023 12:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top