Home > मॅक्स किसान > बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या...

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या...

बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या...
X

बीड जिल्हात सर्वाधिक जलयुक्त शिवाराची काम झाली असा दावा स्वत: बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री पंकजा मुंडे करतात. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढल्याचं जोरदार भाषण राज्याच्या विधीमंडळात ठोकतात. मात्र, त्या वाढलेल्या उत्पनाचे दाम शेतकऱ्याला किती मिळतात? असा सवाल आज बीडमध्ये झालेल्या 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्याने समोर उभा राहतो.

बीड जिल्ह्यात आज महाशिवरात्रीच्या दिवशी 2 शेतकऱ्यांनी तर एका ग्रामसेवकाने आत्महत्या करून, आपलं जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यामुळं बीड जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सरकारकडून कर्जमाफी केल्याचं सांगितलं जात आहे. परंतु खरंच आज ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीय का? झाली असेल तर मग शेतकरी आत्महत्या का होत आहेत? या प्रश्नांसह अनेक प्रश्न आज समोर येत आहेत....

बीडच्या केज तालुक्यातील खर्डेवाडी येथील शेतकरी, महादेव रामभाऊ भोसले या शेतकऱ्यांनी, शेतात असलेली सततची नापिकी आणि डोक्यावरील कर्जाच्या बोजामुळं गळफास घेऊन आत्महत्या केलीय. विशेष म्हणजे महादेव हे 15 ते 20 वर्षांपासून गावपातळीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. मग शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं कर्ज दिसलं नाही क ? शिवसेनेकडून शेतकऱ्यांना मदत दिले जाते असं सतत पक्षप्रमुख म्हणत असतात. मग, त्यांची मदत पेशाने शेतकरी असलेल्या कट्टर शिवसैनिकांच्या घरात का नाही गेली ? असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित रहात आहे...

दुसरी आत्महत्या ही वडवणी तालुक्यातील, पिंपरखेड येथील दामोदर गणपती शिंदे यांनी केली... दामोदर यांना वडीलोपार्जीत साडेचार एकर जमीन होती. पत्नी, दोन मुलं, एक मुलगी असलेल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत असत. शेतीसाठी व मुलांच्या शिक्षणाचा खर्च पेलत नसल्याने त्यांनी वडवणी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह इतर खाजगी बँकेचेही कर्ज उचलले होते. माञ, निसर्गाच्या अवकृपेने दुष्काळी परिस्थितीने व सततच्या नाफिकीमुळे शेतात कोणतेही उत्पादन निघाले नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यातच दोन वर्षापुर्वी मुलीच्या लग्नासाठी काही जमीन विकण्याची वेळ आली. बँकेचे कर्ज वाढत गेले, उर्वरित दोन एकर जमिनीत या वर्षी केलेला खर्च देखील आला नाही. त्यामुळे कर्जाचा बोजा अधिकच वाढला. मागील काही दिवसात ते तणावात होते. त्यातच सोमवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

तिसरी घटना ही अंबाजोगाईत घडलीय....धारूर तालुक्यातील देवठाणा-जैतापूर-खामगाव चे ग्रामसेवक राजाभाऊ बन्सी जोगदंड यांनी अंबाजोगाई जवळच्या बुट्टेनाथ परिसरात आत्महत्या केली..

या महाशिवरात्रीच्या एकाचं दिवशी तीन आत्महत्या झाल्याने, बीड जिल्ह्यात सरकार विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Updated : 4 March 2019 4:31 PM GMT
Next Story
Share it
Top