Home > Election 2020 > नांदेडमधलं हे मतदान केंद्र विशेष आहे

नांदेडमधलं हे मतदान केंद्र विशेष आहे

नांदेडमधलं हे मतदान केंद्र विशेष आहे
X

नांदेड लोकसभा मतदारसंघातील अनेक मतदानकेंद्रापैकी एक मतदारकेंद्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. नांदेड दक्षिणमधील कलामंदिरमागील नेहरू इंग्लिश स्कूलमधलं हे मतदान केंद्र आहे. या केंद्रामधील सर्वच कर्मचारी हे दिव्यांग आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून केलेला हा प्रयोग यशस्वी ठरतांना दिसतोय. जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या पुढाकारातून संपूर्ण दिव्यांग कर्मचारी असलेलं हे केंद्र सुरू करण्यात आलंय. सर्वार्थानं विशेष असलेल्या या मतदानकेंद्राची सजावटही विशिष्टचं आहे. मतदारांमध्येही उत्साह असल्याचं दिसून येतंय. या मतदारसंघाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी …

https://youtu.be/Oxt7SbUR1jU

Updated : 18 April 2019 8:23 AM GMT
Next Story
Share it
Top