असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा
X
देशात सध्या सातत्यानं खोटं बोललं जातंय. अशा परिस्थिती आमचा जाहीरनामा हा सत्य असल्याचं सांगत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मोदींच्या १५ लाख रूपयांसारखी खोटी आश्वासनं आम्ही देत नाही. मात्र, आर्थिक दुर्बलांना ७२ हजार रूपयाचं दिलेलं वचन आम्ही सत्तेत आल्यास कुठल्याही परिस्थिती देऊ, असं आश्वासन राहुल यांनी दिलं. काँग्रेसच्या यावेळच्या जाहीरनाम्याला ‘जनआवाज’ असं नाव देण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या घोषणा :
– काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
- मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार
– पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
– शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार
– मार्च 2020 पर्यंत 22 हजार पदे भरली जाणार
– गरिबीवर वार, 72 हजार, या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार
– मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार
– 10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
– गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचं किमान उत्पन्न 72 हजार करु
– तरुणांना उद्योगांसाठी 3 वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
– शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही