News Update
Home > Election 2020 > 'या' लोकसभा मतदारसंघात उद्या निवडणूक होणार नाही

'या' लोकसभा मतदारसंघात उद्या निवडणूक होणार नाही

या लोकसभा मतदारसंघात उद्या निवडणूक होणार नाही
X

निवडणुकीचा हंगाम सुरु झाला असताना निवडणुकीत मतदारांवर पैसाच प्रभाव टाकण्याचे प्रयत्न सर्वच ठिकाणी होत असतात. यावरच प्रभाव टाकण्यासाठी निवडणूक आयोगाने ठोस पावले उचलत तामिळनाडूतील वेल्लोर येथे गुरुवारी १८ एप्रिलला होणारी निवडणुकच रद्द केली आहे. गेल्या दोन आठवड्यात द्रुमकाच्या नेत्यांकडून बेहिशेबी रकमेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान द्रमुकचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे खजिनदार एस. दुरईमुरुगन यांचा मुलगा कथिर आनंद याच्या घरावर छापा टाकून मोठी रोकड जप्त केली होती. या कथित गैरव्यहारामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे येथील मतदान प्रक्रिया रद्द करण्याची शिफारस केली होती. अखेर मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तामिळनाडूच्या वेल्लोर मतदारसंघातील मतदान रद्द करण्याचे आदेश दिले.

https://twitter.com/ANI/status/1118152180819578880

Updated : 17 April 2019 3:58 AM GMT
Next Story
Share it
Top