Home > मॅक्स रिपोर्ट > विश्वविजेता ठरला परंतु रस्ता नाही घराला

विश्वविजेता ठरला परंतु रस्ता नाही घराला

विश्वविजेता ठरला परंतु रस्ता नाही घराला
X

बीड जिल्हा हा खेळाडूंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच बीड जिल्ह्याच्या मातीतून अनेक खेळाडू खेळाच्या माध्यमातून अनेक उच्च पदावर पोहोचले आहेत. अविना साबळे यांना आपण सर्वच ओळतो ते ही याच बीड जिल्ह्यातील आहे. अविनाशच्या नावावर ऑल्मिपीक पासून ते बरेच विश्व विक्रम त्याच्या नावावर आहेत. त्यामुळे अविनाशच्या यशाचं कौतूक फक्त बीड जिल्ह्यातचं नाही तर जगभारात होत आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा या गावातील अविनाश साबळे जगभरात पोहचा असला तरी आज त्याच्याचं घरी पोहचण्यासाठी रस्ता नाही ही बातमी आपल्या सर्वाना सुन्न करणारी आहे.





बीड जिल्ह्याचे नाव राज्यांत, देशात नव्हे तर जगाच्या नकाशावर सोनेरी अक्षराने अविनाश साबळे यांनी आपल्या कर्तूत्वाने कोरले आहे. मात्र त्याच्या गावी जाण्यासाठी रस्ता नाही. ही खेदाची बाब आहे. सध्या जो रस्ता आहे तो कित्येक वर्षापासून झालाच नाही अनेक शासन प्रशासनाकडून आश्वासन मिळाली आहेत. मात्र, अजूनही रस्त्याचं काम झालं नाही. शासनाने आमचा रस्त्याचं काम मार्गी लावाव अशी इच्छा अविनाशच्या वडिलांनी आणि आईने व्यक्त केला आहे



अविनाशचे आई वडिल

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गावांमध्ये ये जा करण्यासाठी रस्त्याची आवश्यकता असते. मात्र, याची दखल स्थानिक आमदार बाळासाहेब आजबे यांनी घेतली आहे. या कामासाठी त्यांनी तब्बल 4 कोटी रूपयांचा निधी या रस्त्यासाठी असल्याची माहिती आमदार आजबे यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिली आहे.



आमदार बाळासाहेब आजबे

ज्यावेळेस अविनाश साबळे हे देशासाठी खेळतात त्यावेळेस ते कसल्याही प्रकारचा विचार करत नाहीत. मात्र, ते ज्या गावांमध्ये राहतात त्या गावातील व मतदार संघातील आमदारांनी मात्र अनेक वेळा त्यांना आश्वासन देत आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी देखील अगदी काही दिवसा तुम्हाला रस्ता करून देतो असे आश्वासन दिले होते. मात्र, दोन वर्ष उलटून गेले तरीही रस्ता झालाच नाही.




जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा

दरम्यान अविनाश साबळे यांनी बीडसह देशाचं नाव जगात नावलौकिक केलं आहे. अविनाश खेळत असताना देशाचा प्रतिनिधी म्हणून खेळत असतो आणि यश संपादनही करत असतो. परंतू आपले लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा हे फक्त त्यांच्या मुलभूत प्रश्नांना फक्त झोलवत आहेत का? असा सवाल प्रामुख्याने समोर येत आहे. आश्वासनानंतर दोन वर्ष उलटून गेल्याने हा रस्ता होणार आहे की नाही ? की आमची पायपीट अशीच सुरू राहणार असाच प्रश्न अविनाशच्या आई-वडिलांसमोर उभा राहिला आहे.


Updated : 11 Jan 2024 3:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top