Home > मॅक्स रिपोर्ट > 'तर मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार - भाजप नेते राम कदम

'तर मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार - भाजप नेते राम कदम

तर मुलीला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार - भाजप नेते राम कदम
X

दहीहंडीच्या निमित्तानं भाजप नेते राम कदम यांनी ‘देशातील सर्वात मोठी’ दहीहंडी उभारल्याचा दावा करत निवडणुकीआधी भाव खाण्याचा प्रयत्न केला. या दहीहंडीसाठी स्थानिकांनी एकच गर्दी केली होती. आणि या गर्दीसमोर राम कदम जरा जास्तच जोशात आले.आणि या जोशातच त्यांचा जीभेवरचा ताबा सुटला,’ तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तरीही मला सांगा मी त्या मुलाली पळवून आणण्यास मदत करतो.’ असा भाषेत त्यांनी गर्दी समोर वक्तव्य केलं.

‘कोणत्याही कामासाठी भेटू शकता. साहेब, साहेब मी तिला प्रपोज केलं, ती मला नाही म्हणते, प्लिज मदत करा. शंभर टक्के मदत करणार. आधी मी सांगेन तुम्ही तुमच्या आई वडिलांना घेऊन या. जर आई-वडील म्हणाले की ही मुलगी मला पसंत आहे, तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार. त्या मुलीला पळवून आणण्यास मी मदत करेन. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा, असं राम कदम म्हणाले.

Updated : 4 Sep 2018 1:56 PM GMT
Next Story
Share it
Top