गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या
Max Maharashtra | 23 Aug 2018 1:11 PM IST
X
X
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड तालूक्यातील तांदूळवाडी येथील एका 17 वर्षीय तरुणीने गावातील मुलांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. प्रियंका बजरंग मोरे असे पीडित मुलीचे नाव असून गावातील गावगुंड मुलं फोन करून नेहमी त्रास देते होती. तसेच घरी कुणी नसताना घरी येऊन त्रास देत असल्याने प्रियंका हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रियंकाने चार दिवसापूर्वी विष घेउन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला होता मात्र वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचला होता मात्र त्यानंतर प्रियंकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
Updated : 23 Aug 2018 1:11 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire