Home > मॅक्स मार्केट > देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार

देशातील 'या' तीन बँकांचे विलिनीकरण होणार

देशातील या तीन बँकांचे विलिनीकरण होणार
X

सरकारने आज वित्तीय सुधारने अंतर्गत मोठे पाऊल उचलले आहे. देशातील महत्वाच्या बँकांपैकी एक असलेल्या देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांचे विलिनीकरण करण्याची घोषणा आज सरकारने केली आहे. अर्थखात्याचे सचिव राजीव कुमार यांनी याबाबत माहिती दिली आहे. या तीनही बॅंकांचे विलिनीकरण झाल्यानंतर यामधून निर्माण होणारी बॅंक देशातील तिसऱ्या क्रमांकांची बॅंक असल्याचेही कुमार यांनी यावेळी सांगतिले.

बॅंकांचे एकीकरण हा सरकारचा अजेंडा...

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या संदर्भात अर्थसंकल्पात स्पष्ट केले होते त्याप्रमाणे बँकांचे एकीकरण हे सरकारच्या अजेंड्यावर होते. त्यादृष्टीने सरकारने उचललेले हे पहिले पाऊल असल्याची प्रतिक्रिया अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय

विलिनिकरण झालेल्या या तिनही बॅंकाच्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय योग्य असल्याचे सांगत या अरुण जेटली यांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे.

बॅंकींग क्षेत्रात सुधारणांची गरज…

भारतीय बँकींग क्षेत्रात सुधारणांची गरज असल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले असून सरकार या बाबतीत गंभीर असल्याचे सांगत सरकारकडून बँकांतील भांडवलाची गरज लक्षात घेतली जात आहे. जेथपर्यंत एनपीएचा प्रश्न उद्भवतो, तिथपर्यंत सरकार असे धाडसी निर्णय घेईल असं देखील राजीव कुमार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Updated : 18 Sep 2018 4:10 AM GMT
Next Story
Share it
Top