Home > मॅक्स रिपोर्ट > पोलिस म्हणतात बाहेर जाऊ नका, आम्ही म्हाताऱ्या माणसांनी काय खायचं?

पोलिस म्हणतात बाहेर जाऊ नका, आम्ही म्हाताऱ्या माणसांनी काय खायचं?

पोलिस म्हणतात बाहेर जाऊ नका, आम्ही म्हाताऱ्या माणसांनी काय खायचं?
X

कोरोनाने देश लॉकडाऊन झाला. कारखाने बंद झाल्यानं लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला. लोकांनी पुन्हा एकदा आपल्या गावाची वाट धरली. गोर गरीब लोक रस्त्याने पायी घरी जाण्यासाठी निघाले. ज्यांचं गाव आहे. ज्यांची गावाकडं शेती वाडी आहे. अशी माणसं गावाकडं पोहोचली.

मात्र, ज्यांचं गावाकडं कोणीच नाही. आणि त्यांना सांभाळणार देखील कोणी नाही. अशा वृद्धांनी, अपंग लोकांनी नक्की काय करावं? गावाकडं जाण्याचं सोडा, लॉकडाऊन च्या या काळात जवळची दुकानं बंद झाल्यानं एकटे राहणाऱ्या वृद्धांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. बाहेर पडून कुठलाही किराणा आणता येत नव्हता. त्यातच कोरोनाचा सर्वांधिक धोका वृद्धांना असल्यानं त्यांनी बाहेर पडणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण असं चित्र रंगवलं गेलं. त्यामुळं वृद्ध लोकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला.

आता देश हळहळू अनलॉक होत आहे. मात्र, या अनलॉकमध्येही वृद्ध, अपंग लोकांचा प्रश्न कायम आहे. देश अनलॉक होत असला तरी कोरोना चा धोका कमी न एकटं राहणाऱ्या या वृद्ध लोकांनी बाहेर कसं पडायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या संदर्भात आम्ही रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील 80 वर्षाच्या लिलाबाई शिंदे 10 बाय 10 च्या खोलीत राहतात. आम्ही जेव्हा त्यांच्याशी बातचित केली. तेव्हा त्यांनी सांगितलं माझा जन्म 1939 सालचा. 2012 साली मी अपंग झाले. मी वॉल्कर चा वापर करुन चालते. माझ्या जवळ कोणी मुलं बाळ असं कोणी नाही. एक नातू आहे. तो पोलिसात कार्यरत असतो. तो सध्या लांब आहे. तो कर्तव्यावर असल्यामुळं मला पाहण्यासाठी इथं येऊ शकत नाही.

माझं कोणीच नाही! एक तर पोलिस म्हणतात. बाहेर जायचं नाही. म्हताऱ्या माणसांना लवकर होतो. माझ्या सोबत राहणार कोणी नाही. खायचं काय? मला धान्य कोण आणून देणार? लोक नेतात. मला कोण आणून देतंय... मला बसल्यावर कोण आणून देतं. मला औषधं आणावं लागतात. मला महिन्याला संजय गांधींची पेन्शन येते. ती दर महिन्याला येते. एवढ्या हजार रुपयात कसं भागणार? मी जेव्हा अपंग झाले तेव्हा सर्व दाग दागीने मोडले. एक घर पण विकलं आता फक्त एक 10 बाय 10 ची खोली बाकी आहे. त्यातच मी राहते. मला कोणी काही आणून देणार नाही. मला कोणी पाहणारं नाही. मी कसं जगायचं? असा प्रश्न लिलाबाई शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

त्यातच या वृद्ध लोकांना रक्तदाब, मधूमेह, सांधेदुखी असे आजार असतात. गरीब एकटं जीवन जगणाऱ्या या लोकांचा सरकारी दवाखाना हाच एक आधार असतो. मात्र, कोव्हिड च्या काळात अनेक सरकारी हॉस्पिटल कोव्हिड रुग्णालय झाली आहेत. त्यामुळं या दवाखान्यात गेलं तर कोव्हिड होण्याचा मोठा धोका या वृद्धांसमोर आहे. खाजगी दवाखाने तर बंदच आहेत.

रेग्युलर चेकअप साठी सरकारी दवाखान्यात धोका पत्करुन निघालं तरी रिक्षावाले थांबत नाहीत. एखादं अर्धा थांबला तरी दवाखान्यात जायचं म्हटलं तर साफ नकार देतो. कोव्हिड मुळं वृद्धाचं आयुष्य बंदिस्त झालं आहे. बाहेर पडलं त्यांना समोर मृत्यू दिसतो.

शासनानं एकटे जीवन जगणाऱ्या लीलाबाई सारख्या महिलांची काळजी घेण्यासाठी योजना आखणं गरजेचं आहे. मोबाईल क्लिनिकचा वापर करुन अशा वृद्ध लोकांपर्यंत दवाखाना जाऊ शकतो. सरकारकडं देशातील ज्येष्ठ नागरिकांची पूर्ण माहिती आहे. त्यामुळं सरकारला या नागरिकांपर्यंत पोहोचणं अशक्य नाही.

या नागरिकांकडे जर दुर्लक्ष झालं तर कोरोनाने नाही. मात्र, इतर आजाराने या वृद्धांचा मृत्यू होईल. आपल्या समाजामध्ये वृद्धाचं महत्त्व सांगताना प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा म्हणतात...

तुम्हारी महफिलों में हम बड़े बूढ़े जरूरी हैं, अगर हम ही नहीं होंगे तो पगड़ी कौन बांधेगा!

अशी वेळ येऊ नये हीच अपेक्षा

Updated : 27 Jun 2020 12:16 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top