Home > मॅक्स कल्चर > ललीत कला अकादमी तर्फे महाराष्ट्रातील चार कलाकारांचा गौरव

ललीत कला अकादमी तर्फे महाराष्ट्रातील चार कलाकारांचा गौरव

ललीत कला अकादमी तर्फे महाराष्ट्रातील चार कलाकारांचा गौरव
X

ललित कला अकादमीचा जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे साठाव्या राष्ट्रीय प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे आणि गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा उपस्थित होत्या.

यावेळी अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे यांनी आपल्या भाषणात बोलताना मुंबई, त्रिपुरा, इंदूर येथे अकादमी केंद्रे सुरू करण्याविषयी केंद्राने दोन महिन्यांपूर्वी आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्यांकडेही प्रस्ताव दिला असल्याची माहिती दिली. तसंच प्रादेशिक विभागावर ललित कला केंद्र उभारण्या संदर्भात होणाऱ्या दिरंगाई बाबत देखील त्यांनी यावेळी खंत व्यक्त करत ललित कला अकादमीची देशात केवळ पाच पूर्ण विकसित केंद्रे आहेत. महाराष्ट्रातील अनेक कलाकार केंद्र जवळ नसल्याने शिष्यवृत्ती स्वीकारत नाहीत किंवा मिळाली तर सोडून देतात. असं म्हणत प्रादेशिक ललित कला केंद्र उभारणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

शिष्यवृत्ती 30 हजार होणार...

ललित कला अकादमीतर्फे मिळणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत दहा हजारांवरून तीस हजारांपर्यंत वाढ करण्याचा मानस असल्याची घोषणा पाचारणे यांनी यावेळी केली.

यावेळी गोव्याचे राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी देखील आपले विचार मांडले. 'कलाकारांसाठी घेण्यात येणाऱ्या परिश्रमामध्ये माझेही सहकार्य असेल', असे आश्वासन यावेळी मृदुला सिन्हा यांनी पाचारणे यांना दिले.

या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्रातील वासुदेव कामत, जितेंद्र सुतार, सचिन चौधरी, जॉन डग्लस या चौघांसह एकूण १५ कलाकारांचा एक लाखांचा पुरस्कार आणि सन्मानचिन्ह देऊन गोव्याचे राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी गौरव केला.

कलाकृतींचे प्रदर्शन

या 15 कलाकारांचे कला कृतींचे प्रदर्शन जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

या सोहळ्याला ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार, संस्कारभारतीचे संस्थापक बाबा योगेंद्र, राज्याचे कलासंचालक राजीव मिश्र, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे संचालक अद्वैत गणनायक, जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/866171843726645/?t=1

Updated : 26 March 2019 5:32 AM GMT
Next Story
Share it
Top