Home > मॅक्स किसान > मुलीच्या कन्यादान साठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

मुलीच्या कन्यादान साठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले

मुलीच्या कन्यादान साठी पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
X

भुजंग पवार या शेतकऱ्यांनी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केलीय....

लातूर / वैभव बालकुंदे

मुलीच्या लग्नाला पैसे नसल्यानं लग्न खर्च करण्याची चिंता त्याच्यावर होती.हात उसने पैसे मिळत नसल्याने शेवटी त्याने आत्महत्या केली आहे.... ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील सारसा येथील ....

मराठवाड्यात गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे त्यात विशेष म्हणजे लातूर जिल्ह्याला दुष्काळाचे चांगलीच झळ आतापर्यंत बसली आहे त्यामुळे

अनेक दिवसांपासून अशी आत्महत्येचे सत्र सुरू आहे.लातूर तालुक्यातील सारसा येथील भूजंग पवार या शेतक-याने नापिकी व दुष्काळ पडल्याने कंटाळून मंगळवारी सकाळी शेतातच गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या लग्नाची तारीख काढली पण कसे करावे या चिंतेने ते ग्रासलेले होते.बँकेचे कर्ज मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला.... मात्र कर्जही मिळालं नाही ...महाराष्ट्र बँकेने कर्ज देण्यासाठी नकार दिला ...तसेच शेतामधले उसाचे पीक कारखान्याला नेण्याची विनंती केली मात्र कारखान्याने नेला नाही ...घरात आर्थिक तंगी पाहून शेवटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला ...सोमवारी दुपारी ते घरातून निघून गेले घरच्यांनी रात्री दहा वाजेपर्यंत आले नाही हे पाहून शोधाशोध सुरू केली मात्र गावामध्ये ते सापडले नाहीत... सकाळी त्यांचा भाऊ जेव्हा शेतात गेला आत्महत्या केल्याचं दिसलं.

मराठवाड्यात आज दुष्काळजन्य परिस्थिती असल्याने संसार कसे भागवत हा प्रश्न शेतकरी कुटुंबा समोर आहेत...त्यामुळे सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे... अन्यथा यासारख्या अनेक आत्महत्या यापुढे शेतकरी करतील अशी भीती आता व्यक्त केली जात आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर पावलं उचलाव अशी शेतकऱ्यांची मागणी आहे

Updated : 13 Nov 2018 3:32 PM GMT
Next Story
Share it
Top