Home > मॅक्स किसान > #दुष्काळाच्या_झळा : संभाजी पाटील निलंगेकरांनी केली मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी..

#दुष्काळाच्या_झळा : संभाजी पाटील निलंगेकरांनी केली मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी..

#दुष्काळाच्या_झळा : संभाजी पाटील निलंगेकरांनी केली मोबाईलच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी..
X

भाजपच्या मंत्र्यांकडून बीडच्या शेतकऱ्यांची घोर चेष्टा...

बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळाचे वास्तव चित्र पाहाण्यासाठी राज्याचे कामगार कल्याण मंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माजलगाव आणि वडवणी तालुक्यातील पोखरी, कान्हापूर, ढोरवाडी या गावांना भेटी दिल्या. दुष्काळाची परिस्थितीची पाहाणी केली. दरम्यान माजलगाव तालुक्यातील नित्रुड या ठिकाणी रात्री मोबाईलच्या प्रकाशात कापसाची पाहणी केली. रात्रीच्या वेळी तेही बॅटरीच्या प्रकाशात या मंत्रीमहोदयांना काय कळला असेल देवच जाणे, मात्र भीषण दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही घोर चेष्टाच म्हणावी लागेल.

https://youtu.be/T2Du55hwaT4

Updated : 28 Oct 2018 11:00 AM GMT
Next Story
Share it
Top