Home > मॅक्स रिपोर्ट > सांगली जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यात होतेय चर्चा....

सांगली जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यात होतेय चर्चा....

सांगली जिल्ह्यातील या ग्राम पंचायतीने आरोग्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाची राज्यात चर्चा होत आहे. काय आहे हा निर्णय पहा मॅक्स महाराष्ट्रच्या या रिपोर्ट मध्ये...

सांगली जिल्ह्यातील या ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाची राज्यात होतेय चर्चा....
X

मधुमेह आणि रक्तदाब हे आजार प्रत्येक घरापर्यंत पोहचलेले आहेत. ग्रामीण भागात गरीब परिस्थितीमुळे अनेक रुग्णांना या रोगावरील औषधांचा खर्च परवडत नाही. पैसे नसल्याने अनेकदा या गोळ्या घेतल्या जात नाही. एक गोळी चुकवणे हे रुग्णासाठी जीवघेणे ठरू शकते. गरीब परिस्थितीमुळे गावातील एकहि रुग्ण अशा औषधांपासून वंचित राहू नये यासाठी सांगली जिल्ह्यातील वांगी या ग्रामपंचायतीने कॉंग्रेसचे जेष्ठ नेते दिवंगत पतंगराव कदम नावे ग्राम संजीवनी योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत गावातील नागरिकांना या गोळ्या मोफत देण्यात येत आहेत. या गोळ्या देण्यासाठी ग्रामपंचायतीने फार्मासिस्ट च्या माध्यमातून टेंडर देखील दिलेले आहे..

या योजनेचा लाभ गावातील अनेक गरजू रुग्ण घेत आहेत. यामुळे गरीब रुग्णांना आर्थिक आधार तर मिळत आहेच पण त्यांना वेळेवर औषधे देखील पोहचत आहेत. या योजनेमुळे येथील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.





वांगी येथील विद्यमान लोकनियुक्त सरपंच विजय होनमाने हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांनी गावात वेगवेगळे लोकोपयोगी निर्णय घेत गावाला प्रगती पथावर नेले आहे. हे निर्णय घेत असताना गावातील गरीब कुटुंबांची विशेष काळजी त्यांनी घेतलेली आहे. वांगी येथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालयास त्याच्या अंत्यविधीचा खर्च करणे सामान्य नागरिकांना जिकीरीचे ठरते. हि बाब लक्षात घेऊन ग्राम पंचायतीने संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन योजनेची निर्मिती केलेली आहे. या योजनेंतर्गत अंत्य विधीचे सर्व साहित्य मोफत दिले जाते.





या योजनांसह वांगी गावाने भौतिक सुधारणा करत आपल्या गावाला प्रगती पथावर नेऊन ठेवलेले आहे. सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण,स्वच्छता, अंतर्गत रस्ते , सुसज्ज शाळा उत्तम नगर रचना करत महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार मिळविणाऱ्या वांगी ग्राम पंचायतीने राज्यात आपला ठसा उमटवला आहे....


Updated : 14 Oct 2022 2:25 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top