Home > मॅक्स रिपोर्ट > कालव्याला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी

कालव्याला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी

कालव्याला लागलेल्या गळतीमुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी
X

वाघ प्रकल्पाचा फायदा कमी तोटाच जास्त...

मोखाडा शहरासह लगतच्या गावपाड्यांना शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वाघ नदीवर सन 1996 मध्ये हाती घेण्यात आलेल्या वाघ प्रकल्पाच्या धरणाचे कामकाज गेल्या 12 वर्षां पूर्वीचपूर्ण होऊन यानंतरही 12 ते 15 वर्षाचा कालावधी उलटला असताना ही अद्यापही या धरणाच्या कालव्याचे काम पूर्ण झालेलं नाही.

लाखों रुपये खर्च झालेल्या या धरणाच्या पाटाचे काम जून महिन्यात पूर्ण करण्याची "डेटलाईन" दिली होती परंतु दुर्लक्षित कारभारामुळे हे काम रेंगाळलेच आहे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे दरवर्षीच दुरुस्तीच्या नावाखाली खर्च होत असताना देखील मोठ्या प्रमाणात या कालव्याची पडझड झालेली आहे.

510 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणून सन 1996 मध्ये या धरणाचे काम हाती घेण्यात आले या प्रकल्पाच्या माध्यमातून मोखाडा शहरासह लगतच्या गावपाड्यांचा प्रश्न सुटेल अशी अश्या होती परंतु असे काहीच साध्य झालेले नाही.

टाकपाद्या पर्यत येणाऱ्या या कालव्याचे काम जून मध्ये पूर्ण करायचे होते परंतु हे काम पूर्ण झाले नाही. यामुळे पुन्हा तारीख पे तारीख असल्याचे चित्र आहे. तसेच हा प्रकल्प पूर्ण होण्या अघोदरच या धरणाला प्रचंड गळती लागली लागल्याने या धरणाचा पाणी साठा कमी होत असताना पूर्ण करण्यात आलेल्या कालव्याला सुद्धा मोठी गळती लागल्याने परिसरातील जमीन कायमच ओलिताखाली रहात असल्याने लगतची भट शेती नापीक होत आहे.

या धरणामुळे मोखाडा शहराचा पाणी प्रश्न सोडाच परंतु लगतच्या गावपाड्याचा सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटलेले नाही. ज्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत त्यांची फरफट झाली असून काही शेतकऱ्यांना अद्यापही जमिनीचा मोबदला मिळालेला नाही.

https://youtu.be/gAgrMpSkrn0

Updated : 8 Oct 2018 9:24 AM GMT
Next Story
Share it
Top