Home > मॅक्स किसान > मॅरेथॉनसाठी शेतकऱ्यांवर बंदी

मॅरेथॉनसाठी शेतकऱ्यांवर बंदी

मॅरेथॉनसाठी शेतकऱ्यांवर बंदी
X

साताऱ्याच्या शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन सरकाविरोधात मोर्चा पुकारला असून आज त्यांनी मुंबईत धडक दिली आहे. मात्र वाहतूक आणि मॅरेथॉनमध्ये अडथळा येऊ नये या कारणाचा हवाला देऊन या शेतकऱ्यांना पोलिसांनी मुंबईच्या वेशीवर अडवलं आहे. होय सकाळ पासून सातारा खंडाळ्याहून आलेले शेतकरी भर उन्हातानात मानखुर्द येथे बसलेले आहे. कुठलीही मीडिया किंवा यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहचली नसताना मॅक्समहाराष्ट्रची टीम तिथे पोहचली, आणि या शेतकऱ्यांच्या व्यथा, नेमक्या काय मागण्या आहे आणि अर्धनग्न मोर्चा काढण्याची नेमकी काय संकल्पना आहे हे जाणून घेतलंय.

पाहा हा व्हिडिओ...

https://youtu.be/L93paqgalI8

सातारा खंडाळ्याहून हा मोर्चा 12 जानेवारीला निघाला असून आज त्याचा 9वा दिवस आहे. 10 वर्षांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी हे शेतकरी आंदोलन, मोर्चा करत आहेत परंतु सरकारने पूर्णतः याकडे दुर्लक्ष केलं आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा या सरकारला कधी समजणार आणि एकीकडे शेतकऱ्यांचे हाल होतेय आणि राजकारणी झालेत मालामाल अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

Updated : 20 Jan 2019 1:11 PM GMT
Next Story
Share it
Top