Home > मॅक्स रिपोर्ट > टेंभूचा कॅनॉल उशाला तरी भांबर्डेकरांच्या कोरड घशाला

टेंभूचा कॅनॉल उशाला तरी भांबर्डेकरांच्या कोरड घशाला

टेंभूचा कॅनॉल उशाला तरी भांबर्डेकरांच्या कोरड घशाला
X

दरवर्षी सुमारे १३०० दशलक्ष घनमीटर पाणी समुद्रात वाहून जाते. पुरातून वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात न्यावे अशा महत्त्वाकांक्षी योजना देशात आखल्या गेल्या. त्यापैकीच सत्यात उतरलेली टेंभू योजना ही देशातील महत्त्वाची योजना ठरली. परंतु सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या भांबर्डे आणि परिसरातील गावांसाठी अद्याप पर्यंत या योजनेतील पाणी पोहचलेले नसल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात, प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा ग्राऊंड रिपोर्ट

भांबर्डे गावामध्ये मोठ्या साठवण तलाव आहे. हा तलाव टेंभू योजनेतील पाण्याने भरण्यासाठी बंदिस्त पाईप लाईनचे काम पूर्ण झालेले आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पुढाकाराने याची ट्रायल देखील घेण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात सरकार बदलले. तलावात पाणी पडले तर नाहीच तलावात पाणी येण्याच्या भांबर्डेकरांच्या आशेवर मात्र पाणी पडले.सध्या पावसाचे प्रमाण सरासरी जास्त दिसत असले तरी प्रती दिवस एक ते दोन मिलिमीटर इतकाच पाऊस पडतो.यामुळे भर पावसाळ्यात नाले ओढे कोरडे आहेत. तर तलाव केवळ पंचवीस टक्के इतकाच भरलेला आहे. यातील पाणी शेती तसेच पिण्यासाठी वर्षभर पुरणे अशक्य आहे. त्यामुळे वर्ष कसे जाणार या समस्येत शेतकरी आहेत.

तर दुसरीकडे आज कोयना धरणाचा विसर्ग सुमारे ३२ हजार क्युसेक्स इतका सुरू आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी वाहून जात आहे. आणि दुष्काळी भागात पाण्याची वानवा आहे. तेंव्हा प्रकल्प तयार असताना केवळ इच्छाशक्ती नसल्याने हे पाणी सोडले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.


Updated : 30 Aug 2022 10:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top