Home > मॅक्स रिपोर्ट > कुष्ठरोग्यांची अनाथ मुलं कशी शिकत आहेत?

कुष्ठरोग्यांची अनाथ मुलं कशी शिकत आहेत?

X

मुंबईतील मानखुर्द मध्ये एक भाग कुष्ठरोगाची वस्ती म्हणून ओळखला जातो. पुर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुष्ठरोगी या ठिकाणी राहायचे. अनेकांना कुष्ठरोगामुळं दिव्यांगत्व आलं आहे. लॉकडाऊनच्या अगोदर हे लोक भीक मागायचे. भीक मागणं गुन्हा असलं तरी पोटासाठी हे लोक भीक मागायचे. लॉकडाऊन नंतर त्यांचं बाहेर पडणं बंद झालं आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या समोर काय खावं हा प्रश्न निर्माण झाला आहे.

सरकारकडून पुर्वी त्यांना 1 हजार रुपये दिले जायचे. आत्ता अवघे 2.5 हजार रुपये दिले जातात. अशा परिस्थितीत बॅंकेचं एकत्रीकरण झाल्याने 4 महिन्यांपासून या लोकांना निधी मिळालेला नाही. अशा परिस्थितीत घरं कसं चालावायचं मुलांचं शिक्षण कसं करायचं? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शिक्षक दिनानिमित्त कुष्ठरोग्यांच्या वस्तीत आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी बातचीत केली...

Updated : 7 Sep 2021 4:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top