Home > मॅक्स रिपोर्ट > मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्तानंतर तलाठ्यांचं आंदोलन मागे

मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्तानंतर तलाठ्यांचं आंदोलन मागे

मॅक्समहाराष्ट्राच्या वृत्तानंतर तलाठ्यांचं आंदोलन मागे
X

गेले चार ते पाच दिवस झाले राज्यातील गाव कामगार तलाठ्यांनी राज्यभरात विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे मोठे हाल चालू होते. महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा येवू घातल्या आहेत. त्या परिक्षाची अर्ज भरण्याची शेवटची मुद्दत ही 30 ऑक्टोंबर आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिनियल, या दाखल्यांची आवश्यकता असते. मात्र, तलाठी आंदोनामुळे हे दाखले मिळणे मुश्कील झाले होते. या संदर्भात मॅक्स महाराष्ट्राने 'तलाठ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन, विद्यार्थ्यांचे हाल' असं वृत्त दिले होते.

त्यानंतर तलाठ्यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता हे आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेत असल्याचं तलाठ्यांनी म्हटलं आहे. मॅक्समहाराष्ट्रने विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडल्या म्हणून विद्यार्थ्यांनी मॅक्समहाराष्ट्रचे आभार मानले आहेत.

Updated : 26 Oct 2021 12:46 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top