Home > Election 2020 > मोदी - शहांबाबत ६ मेपर्यंत निर्णय घ्या : सुप्रीम कोर्ट

मोदी - शहांबाबत ६ मेपर्यंत निर्णय घ्या : सुप्रीम कोर्ट

मोदी - शहांबाबत ६ मेपर्यंत निर्णय घ्या : सुप्रीम कोर्ट
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आदर्श आचारसंहिता भंगप्रकरणी कॉंग्रेसने आत्तापर्यंत ११ याचिका दाखल केल्या असून या ११ याचिकांपैकी निवडणूक आयोगाने फक्त २ याचिकेवर निर्णय सुनावला आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आयोगाने मोदींना 'क्लीन चिट' दिली आहे. लातूर आणि वर्धा येथे मोदींनी भाषणातून आचारसंहितेचा भंग केला होता, असा दावा करून या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. परंतु, आयोगाने त्यांना 'क्लिन चीट' दिली. निवडणुकींची घोषणा झाल्यापासून पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी प्रक्षोभक भाषणे करून आणि भाषणांमध्ये लष्कराच्या जवानांचा राजकीय वापर करून आचारसंहितेचा भंग केल्याचं कॉंग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

कॉँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली असून त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोदी-शहांविरोधात अकरा तक्रारी दाखल करुनही निवडणूक आयोगाने केवळ दोनच तक्रारींवर निर्णय दिला. यासंदर्भात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावनीत कॉँग्रेसच्या नऊ तक्रारींवर ६ मेपर्यंत निर्णय देण्याचे आदेश मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी आयोगाला दिले आहेत. यावेळी निवडणूक आयोगाच्या निष्क्रियेबाबत देव यांनी बोट ठेवत निवडणूक आयोग भेदभाव करत असल्याचा आरोप सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीद्वारे केला आहे.

Updated : 3 May 2019 3:53 AM GMT
Next Story
Share it
Top