Home > मॅक्स रिपोर्ट > शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास ठेकेदारांच्या घशात

शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास ठेकेदारांच्या घशात

सर्वशिक्षा अभियानातून विद्यार्थ्यांची सोय़ व्हावी अशी अपेक्षा आहे. पण कंत्राटदारांचा भ्रष्टाचार आणि त्याला यंत्रणेचा अभय यामुळे हे अभियान सर्व 'शिक्षा' अभियान होते आहे का, हे दाखवणारा आमचे करस्पाँडन्ट मोसीन शेख यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास ठेकेदारांच्या घशात
X

शालेय विद्यार्थ्यांचं पोषण व्हावे यासाठी सरकार सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार ही योजना राबवत आहे....यात पहिली ते सहावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज हा पोषण आहार दिला जातो. यामध्ये पहिली ते आठवीसाठी ५ किलो ४०० ग्राम तांदूळ, दीड किलोग्राम मसुरडाळ तर दोन किलोग्राम हरभरा डाळ यांची खिचडी विद्यार्थ्यांना दिली जाते. तसेच सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना साडे आठ किलोग्राम तांदूळ दीड किलोग्राम मसुरडाळ आणि तीन किलोग्राम हरभरा डाळ मिसळून पोषण आहार दिला जातो. मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांपर्यंत हा पोषण आहार पोहचतच नाही, कारण, शासनाकडून पुरवला जाणाऱ्या या आहारावर डल्ला मारला जात आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यातील भाटशिरपुरा व देवधानोरा या शाळेत आहारच कमी पोहोचला असल्याचे एक उदाहरण समोर आलं आहे, विशेष म्हणजे या सर्व प्रकारची तेथील शिक्षकांनीच पोलखोल केली आहे...पुरवठादारांकडून देण्यात आलेल्या ५० किलो वजनाच्या गोणीत फक्त ३५ किलोच तांदूळ निघाला तर तूरडाळ व हरभऱ्याच्या गोण्याही कमी वजनाच्या निघाल्याची तक्रार मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे यांनीच केली आहे.


असं असतानाही प्रशासनला याचे गांभीर्य नसल्याचं पाहायला मिळतेय, आलेले धान्य तपासून घेण्याची जबाबदारी मुख्यध्यापकांची आहे. त्यांनी आलेला पोषण आहार मोजून घ्यावा त्यात तफावत आल्यास जिल्हा परिषदेकडे तक्रार करावी, असे म्हणत जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार फड यांनी भ्रष्टाचार होत असेल तर कारवाई केली जाईल असे सरकारी उत्तर दिले आहे.

Updated : 2 March 2021 2:47 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top