Home > मॅक्स रिपोर्ट > विद्यार्थ्याने बनवली चार्जिंगवर चालणारी सायकल

विद्यार्थ्याने बनवली चार्जिंगवर चालणारी सायकल

पेट्रोल डिझलच्या महागाईनं भल्याभल्याचं कबरडं मोडलं आहे. पण ११ वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनं हार मानली नाही. भंगारातील सायकलचा सांगाडा घेऊन चार्जिंगवर चालणारी सायकल तयार केली आहे. निखिल बोडकेच्या जुगाड सायकवर राईड मारण्यासाठी आता लोकांची रिघ लागली आहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा exlusive रिपोर्ट...

विद्यार्थ्याने बनवली चार्जिंगवर चालणारी सायकल
X


पेट्रोल,डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना गाड्या चालवणे परवडेना गेले आहे.लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद असल्याने अनेकजण अडचणीत आले आहेत.उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पहायला मिळत आहे.लॉकडाऊनच्या काळात शाळा,कॉलेज यांचे क्लास ऑनलाइन पद्धतीने घेतले जात होते.फावल्या वेळेचा सदुउपयोग करीत लुऊळ ता.माढा येथील रहिवासी असलेल्या निखिल बोडके या विद्यार्थ्यांने चार्जिंगवर चालणारी सायकल बनवली आहे.निखिल कुर्डुवाडीतील के.एन.भिसे कॉलेजला इय्यता 11 मध्ये शिकत आहे.एसटी संप व लॉकडाऊनमुळे कॉलेजला जाण्या-येण्यासाठी अडचण येऊ लागली.त्यामुळे निखिल पर्यायी व्यवस्था शोधत होता.त्याने घरावर पडलेल्या जुन्या सायकलचा सांगाडा घेऊन त्या सांगाड्यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली व चार्जिंगवर चालणाऱ्या सायकलचा प्रयोग 8 ते 10 दिवसात यशस्वी केला.असे निखिल बोडके याने बोलताना सांगितले.या सायकलची चर्चा गावच्या आजूबाजूच्या परिसरात असून सायकल पाहण्यासाठी व राईड मारण्यासासाठी नातेवाइकांसह परिसरातील नागरिक घरी भेटी देऊ लागले आहेत.त्याच्या या नवीन प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पेट्रोल दरवाढीमुळे सायकल बनवण्याची सुचली कल्पना

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना निखिल बोडके म्हणाला की,एसटी बंद असल्याने कॉलेजला जाण्या-येण्यासाठी अडचण येत होती.पेट्रोलदर वाढल्याने शेतातील इतर कामासाठी दोन चाकी गाडी परवडेना गेली होती.त्यामुळे सायकल बनवण्याची कल्पना सुचली.चार्जिंगवर चालणारी सायकल बनवण्यासाठी गावातून 12 व्होल्टेजच्या 4 बॅटऱ्या विकत घेतल्या.बॅटऱ्या ठेवणासाठी लोहराकडे जाऊन पेटी बनवून घेतली.तसेच इतर साहित्य ऑनलाइन मागवून घेतले.सायकलसाठी दीड hp ची मोटार वापरली असून मोटार चालावी यासाठी 12 व्होल्टेच्या 4 बॅटऱ्या बसवण्यात आल्या आहेत.या सायकलला स्विच बसवले असून चालू बंद करता येते.पारंपरिक सायकल चैनपेक्षा थोडी जाड चैन या प्रयोगासाठी वापरण्यात आली आहे.वायरींगसाठी कंट्रोलर वापरण्यात आले आहे.सायकलला मीटर बसवला असल्याने चार्जिंग किती झाली आहे हे कळते.बॅटरी 4 तास चार्जिंग केल्यास सायकल साधारण 60 ते 70 किलोमीटर जात असून सायकलने टेंभुर्णी ते लऊळ असा प्रवास निखिलने केला आहे.सायकल बनवण्यासाठी 16 ते 17 हजार रुपये खर्च आला असून तो ऊस लावण्याच्या कामाला जाऊन भागवला आहे.असे निखिलने सांगितले.यावेळी निखिलच्या आजोबाने बोलताना सांगितले की,एसटी बंद झाल्याने कॉलेजला जाण्या-येण्यासाठी निखिलला अडचणी येऊ लागल्या होत्या.एकदा निखिलने घरची दोनचाकी गाडी कॉलेजला नेहली होती. परंतु ती अर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर तिच्यातील पेट्रोल संपल्याने ती बंद पडली.त्यामुळे अशी सायकल बनवण्याची कल्पना सुचली.असे निखिलचे आजोबा सांगतात.





सायकलला अँक्सीलेटर असल्याने पळते वेगाने

निखिलने सायकल बनवत असताना या सायकलला अँक्सीलेटर बसवले आहे.त्यामुळे सायकल मोटार सायकल प्रमाणे वेगाने धावते.जसा अँक्सीलेटर वाढवाल तसा सायकलचा वेग वाढतो.वेगाने धावणाऱ्या सायकलला कंट्रोल करण्यासाठी डाव्या बाजूच्या हँडलला ब्रेक बसवण्यात आले आहे.भविष्यात या सायकलला डिस्क ब्रेक बसवण्याचा मानस असल्याचा निखीलने सांगितले.या सायकलला पायडेल नाहीत.पायडेलच्या जागी दीड hp ची मोटार बसवण्यात आली आहे.या मोटारीला बॅटरीवरून कनेक्शन देण्यात आले आहे. त्यामुळे सायकल अधिक वेग धारण करत आहे.या सायकलची रेग्युलर असणारी चैन बदलली असून त्याठिकाणी थोडीशी जाड चैन वापरण्यात आली आहे.बॅटरी सायकलच्या पाठीमागील बाजूस असून त्यातून चार्जिंगमीटर व मोटारीला कनेक्शन देण्यात आले आहे. चार्जिंग मिटरला सायकल बंद-चालू करण्याचे चावीचे स्विच आहे.सायकलचा सांगाडा मात्र जुनाच असून त्याला काळा रंग देण्यात आला आहे.सायकल एखाद्या मोटार सायकल प्रमाणे काम करत असून घरची छोटी-मोठी कामे करण्यासाठी निखिल या सायकलचा उपयोग करीत आहे.

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून बनवली सायकल

चार्जिंगवरची सायकल बनवण्याची जिद्द धरल्याने निखिल बोडकेने दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून सायकल बनवण्यासाठी पैसे जमा केले.सायकलचे साहित्य विकत घेण्यासाठी त्याला घरच्यांकडून थोडीफार आर्थिक मदत करण्यात आली.काम नसल्यास निखिल घरच्या शेतातील कामे करतो.निखीलच्या घरी गाई,म्हशी असून तो त्यांना चारा,पाणी घालण्याचे काम करतो.गाईंचे दूध डेअरीला घालण्यासाठी या चार्जिंगवर चालणाऱ्या सायकलचा काही प्रमाणात उपयोग केला जात असल्याचे निखिलने सांगितले. सायकलचा प्रयोग यशस्वी झाल्याने निखिलच्या घरात आनंदीमय वातावरण आहे.

तुझा प्रयोग यशस्वी होणार नाही सायकल बनवू नकोस पण जिद्द सोडली नाही

तुझा प्रयोग यशस्वी होणार नाही.तू सायकल बनवू नको.असे आम्ही वारंवार सांगूनही त्याने जिद्द सोडली नाही.त्याने रात्र-रात्र जागून सायकल बनवली आहे. आम्ही त्याला सायकल बनवण्यासाठी 2 हजार रुपयांची मदत केली आहे.असे निखीलची आई दिपाली बोडके यांनी बोलताना सांगितले.





भिशी उचलून दहा हजार रुपयांची केली मदत

सायकल बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी 10 हजार रुपयांची मदत केली.कामाला जाऊन भिशी लावली होती.भिशीचे सर्व पैसे नातू निखिलला दिले.त्याने शेतातील इतर कामे बघून सायकल बनवली आहे.त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. असे निखिलच्या आजीने सांगितले.

लहान वयात सायकल बनवल्याने त्याचा अभिमान वाटतो

यावेळी निखिलच्या चुलतीशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की,त्याने सायकल बनवली आहे, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.त्याचे वय खूपच लहान आहे. वयाच्या मानाने त्याने खूपच मेहनत घेतली.सायकल बनवताना त्याला आम्ही रागवत होतो.कारण की परस्थिती खूपच बेताची आहे.त्याने परस्थितीतून मार्ग काढत सायकल बनवण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.त्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. त्याला लहानपनापासून अशी काहीतरी बनवण्याची आवड होती.घरातील लाईट गेल्यावर तो चार्जिंगवर बल्ब चालू करायचा.सायकल बनवण्याची त्याची जिद्द होती.आज त्याने ती पूर्ण करून दाखवली.





मुलाने धरला सायकल पाहण्याचा हट्ट

निखिलच्या आत्या कविता माळी यांनी सांगितले की,मी मोडनिंब ता.माढा येथे राहत असून निखिल माझ्या भावाचा मुलगा आहे.निखिलने सायकल बनवल्याची बातमी आम्ही युट्युबवर पाहिली.सुरुवातीला माझा या गोष्टीवर विश्वास बसेना गेला होता.माझ्या लहान मुलाने जेंव्हा या सायकलची बातमी पाहिली.त्यावेळेस त्याने सायकल पाहण्याचा हट्ट धरला.त्यासाठी तो रडू लागल्याने आम्ही मोडनिंब वरून सायकल पाहण्यासाठी लऊळ या गावी आलो आहोत.निखिलने खूपच छान सायकल बनवली आहे.त्याचा आम्हाला अभिमान आहे.


Updated : 23 Jan 2022 2:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top