Home > मॅक्स रिपोर्ट > कोविड काळातही वस्तीगृहाचे विद्यार्थी शैक्षणिक निधीपासून का राहिले वंचित?

कोविड काळातही वस्तीगृहाचे विद्यार्थी शैक्षणिक निधीपासून का राहिले वंचित?

मुंबईतील समाज कल्याण विभागाअंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना स्टेशनरी ड्रेसकोड छत्री रेनकोट आणि प्रोजेक्ट रिपोर्ट साठी शासकीय निधी जातो. परंतु कोणत्या कारणांमुळे समाज कल्याण विभागाने तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना निधी दिला नाही. शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थी आज ही समाज कल्याण विभागाकडून निधी मिळण्याची वाट पाहत आहेत. समाज कल्याण विभागाचा हा भोंगळ कारभार आहे का? विद्यार्थ्यांना शैक्षणिक निधी न देण्याचा निर्णय समाज कल्याण विभागाने कोणत्या कायद्याअंतर्गत घेतला?यांसारख्या अनेक प्रश्नांवर पाहुयात या विषयाचा स्पेशल रिपोर्ट

कोविड काळातही वस्तीगृहाचे विद्यार्थी शैक्षणिक निधीपासून का राहिले वंचित?
X

ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात उज्वल भविष्य घडवण्यासाठी शहरात येतात. शहरातील शासकीय वस्तीगृहात राहून शासना अंतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक निधीतून अनेक विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करत असतात. मुंबईतील चेंबूर या विभागातील संत एकनाथ शासकीय वस्तीगृहात मागील तीन वर्षांपासून समाज कल्याण विभागाकडून स्टेशनरी, ड्रेसकोड, छत्री, रेनकोट, प्रोजेक्ट रिपोर्ट यासाठी लागणार शैक्षणिक निधी आणि प्रलंबित भत्ते न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अनेक वेळा समाज कल्याण विभागाशी पत्र व्यवहार करुन ही शैक्षणिक निधी कधी दिला जाईल याची माहिती विद्यार्थ्यांना अद्यापही मिळाली नाही,

वस्तीगृह विद्यार्थी दादाराव नागरे यांनी सांगितले.त्या अनुषंगाने मी समाज कल्याण विभागाला पत्र दिलं त्याची जी प्रत आहे सचिवापासून आयुक्तांपर्यंत सर्वांना पाठवली.

परंतु त्यांच असं म्हणणं आहे हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे म्हणजे शासनाने आम्हाला हा निधी दिला नसल्यामुळे आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही. परंतु ज्यावेळी आम्ही समाज कल्याण विभागाकडे विचारणा केली असता असं लक्षात आलं निधीची जी मागणी आहे covid च्या संदर्भातली जी दोन वर्षाची मागणी आहे त्यांनी मागणी पत्र दिलेच नसल्याच माझ्या लक्षात आलं. आणि मागणी पत्र दिल्या नसल्यामुळे राज्याचे जे सचिव आहेत या विभागाचे त्यांनी विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगितलं तुम्ही मागणी पत्र द्यावं आम्ही तुम्हाला निधी देण्यासाठी वित्त विभागाशी बोलणी करू.

कोविडच्या काळातील प्रलंबित असणारे भत्ते आणि शैक्षणिक निधी कधी मिळेल याचे उत्तर अनेक विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडून मिळाल नाही. कोविडच्या काळात आदिवासी विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी स्वयमची योजना सुरु होती. समाज कल्याणची स्वधार योजना देखील सुरू होती. या सगळ्या योजना कोविडच्या काळात सुरू असताना कोविडच्या काळातच प्रवेशीत असणाऱ्या विद्यार्थ्यांवर समाज कल्याण विभागाकडून वस्तीगृहातील विद्यार्थ्यांवर अन्याय का केला जातोय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलेला आहे, असे आनंदराव जी गाडगे म्हणाले.

या संपूर्ण प्रश्नांवर समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी विद्यार्थ्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. कोरोना च्या काळात कॉलेज महाविद्यालये बंद असल्याने वस्ती गृहातील विद्यार्थांना कोविड काळातील वार्षिक निधी देण्यात येणार नाही. परंतु कोविड च्या आधी ज्या विद्यार्थ्यांची वार्षिक हजेरी 75 टक्के कॉलेज मध्ये उपस्थित असते अश्या विद्यार्थ्यांना आम्ही मात्र निधी देतो. मात्र काही निधी विद्यार्थ्यांचे प्रलंबित असल्याने आम्ही सचिवांना पत्र लिहीले आहे. शासनाकडून निधी आल्यानंतर आम्ही तो शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना त्वरित देऊ, अशी माहिती त्यांनी दिली. सहाय्यक आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा शैक्षणिक निधी कधी दिला जाईल ते पाहणं आता महत्त्वाचा ठरेल.


Updated : 21 Oct 2022 3:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top