MaxMaharashrastraImpact : गोगलगायने केलेल्या नुकसानाची मिळणार भरपाई...!
X
लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाईपोटी तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिले आहे. याबाबत सर्वप्रथम आवाज मॅक्स महाराष्ट्रने उठवला होता. लातूर, उस्मानाबाद बरोबरच बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली लागवड केल्यानंतर काही दिवसातच सोयाबीन पिकावर गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला. या गोगलगायीनं चक्क कोवळं सोयाबीन पीक नष्ट केलं बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई , केज, पाटोदा,या भागात गोगलगायनं शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केलं.
याविषयी मॅक्स महाराष्ट्रने 28 जुलै 2022 रोजी काही कृषी तज्ञ व विद्यापीठातील काही तज्ञांने गोगलगायी या किडींचा प्रादुर्भावामुळे थांबवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय उपाय योजना कराव्यात याविषयी मॅक्स महाराष्ट्र ने बातमी दाखवली होती. त्यानंतर काही दिवसातच विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन सुरू झालं आणि या अधिवेशनात 22 ऑगस्ट 2022 रोजी गोगलगाय ग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी याच्यासाठी त्याच्यावर चर्चाही झाली.
बीड जिल्ह्यातील 12959 शेतकऱ्यांचे गोगलगायीने नुकसान केले आहे, त्याचे क्षेत्र 3822.35 हेक्टर आहे, यासंदर्भात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल कृषी विभागाने जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे नुकसान भरपाई मागणीसाठी सादर केला आहे. बीड जिल्ह्यात 12959 शेतकऱ्यांचा 38 22.35 हेक्टर क्षेत्रावर गोगलगायने नुकसान केलेले आहे, त्याचबरोबर 33% च्या वरती या शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं आहे, गोगलगायी हा प्रकार एनडीआरएफ मध्ये नसतो परंतु शासनाने विशेष परवानगी दिलेली आहे, संयुक्तपणे पंचनामे केलेले आहेत व अहवाल तयार करून जिल्हाधिकारी स्तरावर तो सादर केलेला आहे, आणि शासनाकडून त्या शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी माहीती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
शंखी गोगलगायीमुळे झालेले शेतपिकांचे नुकसान प्रकरणी सुमारे ९८ कोटी वितरित झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने जाहीर केले. लातूर उस्मानाबाद बीड या तीन जिल्ह्यांमध्ये शंखी गोगलगायीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये मदतीचे निर्देश दिले होते. यानुसार या तीन जिल्ह्यांना ९८ कोटी ५८ लाख रुपये निधी देण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट: गोगलगायने केलेल्या नुकसानाची मिळणार भरपाई...!






