Home > मॅक्स रिपोर्ट > महाराष्ट्रातील शिवप्रेमी रितेश देशमुखवर का भडकले?

महाराष्ट्रातील शिवप्रेमी रितेश देशमुखवर का भडकले?

महाराष्ट्रातील शिवप्रेमी रितेश देशमुखवर का भडकले?
X

अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवि जाधव आणि लेखक विश्वास पाटील यांचा रायगड वरील एक फोटो वायरल झाला आहे.

मेघडंबरित महाराजांच्या सिहासन समोर बसून काढलेल्या या फोटोमुळे अभिनेता रितेश देशमुख, दिग्दर्शक रवि जाधव आणि लेखक विश्वास पाटील यांच्यावर आता चोहोबाजूंनी टीका होत आहे. जेथे अखंड महाराष्ट्रातील महाराजांचे मावळे आपला माथा टेकतात तेथे चढून बसण्याची यांची हिम्मत कशी झाली असा सवाल सध्या सर्व महाराष्ट्रभर उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सोशल मीडियावरील टिकेनंतर रितेश देशमुख यांनी शिवभक्तांची माफी मागितली आहे.

काय म्हटलंय रितेश यांनी आपल्या माफीनाम्यात

"आपल्या सर्वांचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वापासून प्रेरणा घेण्यासाठी नुकताच रायगड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. सर्व शिवभक्तांप्रमाणे मी ही इथल्या वातावरणाने भारावून गेलो होतो.

त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांच्या पुतळ्याला हार घालून वंदन केलं. आजन्म ज्यांच्या पायावर डोकं ठेवलं त्यांच्या पायापाशी कृतज्ञ होऊन बसण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती.

तिथे बसून आम्ही काही छायाचित्रे घेतली आणि ती सोशल माध्यमातून पोस्ट केली. यामागे फक्त भक्तिभाव होता. ती छायाचित्र घेताना किंवा तिथे बसताना आमच्या मनात कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र आमच्या या कृत्यामुळे कोणीही दुखावलं असेल तर त्याची आम्ही अंतःकरणपूर्वक माफी मागतो."

या सर्व प्रकरणानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. रायगडावरील सिंहासनाच्या चौथऱ्यावर बसून महाराजांच्या मुर्तीकडे पाठ करुन काढलेले काही सेलिब्रेटिंचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. हे खरोखरच निंदनीय आहे. अशी प्रतिक्रिया संंभाजी राजे छत्रपती यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

https://twitter.com/YuvrajSambhaji/status/1015115214805716993

आज होणाऱ्या रायगड विकास प्राधिकरणाच्या बैठकीत खास नियमावली तयार करण्यात येणार असून त्यातील नियम सर्वांना बंधनकारक असतील.

Updated : 6 July 2018 9:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top