Home > मॅक्स रिपोर्ट > सिंदखेडराजा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा तर लोणार नगरपालिकेचा गड कॉंग्रेसने राखला

सिंदखेडराजा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा तर लोणार नगरपालिकेचा गड कॉंग्रेसने राखला

सिंदखेडराजा नगरपालिकेवर शिवसेनेचा झेंडा तर लोणार नगरपालिकेचा गड कॉंग्रेसने राखला
X

आज बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा आणि लोणार नगरपालिकांचे निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये सिंदखेडराजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे तर लोणार नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या पूनम पाटोळे निवडून आल्या आहेत.

सिंदखेडराजा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सतीश तायडे यांनी विजय मिळवत, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि लोकसभेचे सध्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांना मोठा धक्का दिला आहे. सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष म्हणून आज शिवसेनेचे सतीश तायडे नगराध्यक्षपदी निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देविदास ठाकरे यांचा दीड हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. या ठिकाणी 17 जागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणूकीत शिवसेनेचे 7 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक, 1 अपक्ष तर 1 भाजपचा नगरसेवक विजयी झाला आहे.

दरम्यान लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती सिंदखेडराजा विधान सभेचे माजी आमदार तथा माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमानआमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.. मात्र यामध्ये

डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पराभव केलाय.. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण यापूर्वी या नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती होती. मात्र ऐन लोकसभेच्या तोंडावर नगरपालिका गेल्याने शिंगणे यांना मोठा धक्का समजला जात आहे.

दुसरीकडे लोणार नगर परिषदेचेही 17 जागा आणि नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या या निवडणूकीत काँग्रेसच्या पूनम पाटोळे नगराध्यक्ष पदी विजयी झाल्या आहेत. या निवडणूकीत कॉंग्रेसने 10 जागा मिळवत बहुमत मिळवले तर तर शिवसेनेला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.,. यापूर्वी लोणार नगरपालिका ही काँग्रेसच्याच हाती होती आणि आता ही या ठिकाणी सत्ता कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले आहे.

दरम्यान लोणार नगर परिषद ही मेहकर मतदार संघात येत असून या मतदार संघात शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर हे आमदार आहेत तर मागील 25 वर्षांपेक्षा जास्त हा मतदार संघ शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांचा गड मानला जातो. तरीही शिवसेनेला या ठिकाणी विजय खेचून न आणता आल्यानं शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यातच आगामी निवडणुकांचा विचार करता या निवडणुकांचा लोकसभेच्या निकालावर नक्कीच परिणाम पाहायला मिळेल यात शंका नाही.

Updated : 25 March 2019 12:28 PM GMT
Next Story
Share it
Top