Home > मॅक्स रिपोर्ट > दिव्यांगासाठी भंगारातील सायकलींना आधुनिक रुपडं देणारा अवलिया

दिव्यांगासाठी भंगारातील सायकलींना आधुनिक रुपडं देणारा अवलिया

दिव्यांगासाठी भंगारातील सायकलींना आधुनिक रुपडं देणारा अवलिया
X

जुन्या दुर्मिळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आधुनिक रूप किंवा त्याचे नूतनीकरण करण्याकडे अधिक कल वाढू लागला आहे. मात्र सोलापुरातील सायकली रिपेअर करणाऱ्या फारूक सय्यद यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सायकलला आधुनिक रूप देण्यातच आपले आयुष्य घालवले आहे. विशेष करून दिव्यांग नागरिकांसाठी त्यांनी विशेष सायकली तयार करुन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न केलाआहे, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट..

दुचाकी आणि चारचाकी वाहनांना आधुनिक रूप किंवा त्याचे नूतनीकरण करण्याकडे अधिक कल वाढू लागला आहे. मात्र सोलापुरातील सायकली रिपेअर करणाऱ्या फारूक सय्यद यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून सायकलला आधुनिक रूप देण्यातच आपले आयुष्य घालवले आहे. विशेष करून दिव्यांग नागरिकांसाठी त्यांनी विशेष सायकली तयार केल्या आहेत. अनेक सायकल कंपन्यांना जे जमलं नाही ते सोलापुरातील सायकल मेकॅनिक फारूक सय्यद यांनी करून दाखवलं आहे. सायकल वापरण्याने आरोग्य फिट राहते याची देखील जाणीव ठेवून आरोग्य दायक किंवा आरोग्यास लाभदायक सायकली तयार केल्या आहेत. भंगारातील जुन्या सायकलींना आधुनिक रूप देत त्यांनी ही किमया केली आहे. आजूबाजूला असलेल्या दोन ते तीन जिल्ह्यातील नागरिक देखील याचा लाभ घेत आहेत. बिगर दिव्यांग आणि दिव्यांग या दोन्ही प्रकारच्या नागरिकांना याचा लाभ होत आहे.

कंपन्यांना जे जमलं नाही ते करून दाखवल





दिव्यांग नागरिकांसाठी अनेक कंपन्यानी हाताने पायडल मारणाऱ्या सायकली बनवल्या आहेत. परंतु लकवा किंवा पॅरॅलीसमुळे ज्यांचे एक हात आणि एक पाय लुळे पडले आहेत, त्यांचे काय असा सवाल फारूक सय्यद यांना पडला होता. त्यासाठी त्यांनी भंगारातील जुनी सायकल घेत, त्याला आधुनिक रूप दिले. तसेच सीटवर बसून एक हात आणि एक पाय याद्वारे चालवता येणारी सायकल तयार केली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून कमी ताकदीत पायडल मारता यावे, त्यासाठी दोन चैन बसविली आणि एका हाताने आणि एका पायाने लुळे असणाऱ्यासाठी दिव्यांग सायकल तयार केली.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाहनांमुळे आजकाल फक्त वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे नागरिकांचे चालणे किंवा सायकल वापरणे बंद झाल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे शरीराला योग्य व्यायाम न मिळाल्याने नागरिक अनेक रोगांनी ग्रस्त झाले आहेत. अनेक वैद्यकीय तज्ञ सायकल वापरा किंवा वाकिंगचे (चालणे) सल्ले देतात. त्याला अनुसरून सोलापुरातील गुरुनानक चौक येथील सायकल मेकॅनिक फारूक सय्यद यांनी आरोग्यासाठी उपायकारक व लाभदायक अशी सायकल निर्माण केली. सायकलचे पायडल मारता मारता, हाताने हॅन्डवेलच्या माध्यमातून पायडल मारून सायकल चालवता येते. आपल्या संपूर्ण शरीराचे व्यायाम होईल, अशी सायकल निर्माण केली. ही सायकल पूर्णपणे जुन्या सायकली पासून निर्माण केली असून एका ग्राहकास दिली आहे. तो ग्राहक त्या सायकलीचा लाभ घेत आहे.





फारुख सय्यद गेल्या चाळीस वर्षापासून सायकल रीपेरींगचा करतात व्यवसाय

फारुख सय्यद यांचे शिक्षण सातवी पर्यंत झाले असून त्यांचे शिक्षणात मन रमले नाही. लहानपणापासून त्यांना सातत्याने नवनवीन प्रयोग करण्याची सवय होती. त्याचाच उपयोग त्यांना सायकल रीपेरींग व्यवसायात झाला. ते सध्या लोकांनी भंगारात टाकलेल्या सायकलीच्या सांगाड्याना आधुनिक रूप देवून ग्राहकाना जशी सायकल हवी तशी बनवण्याचे काम करत आहेत. त्यांना ही कला उपजत प्राप्त झाल्याचे ते सांगतात. सद्या त्यांच्याकडे दोन कामगार काम करत आहेत. त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर सायकल दुकानावर चालत आहे. त्यांच्याकडे सोलापूर शहरातील नागरिक जुन्या सायकली घेऊन येत असून टाकाऊ सायकलच्या सांगाड्यापासून टिकाऊ सायकल बनवण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. लोकांचा कल सायकल विकत घेण्याकडे वाढला असून त्यांच्या दुकानात ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या दुकानात ग्राहक वाढले आहेत. सोलापुरातील गुरुनानक चौकात फारुख सय्यद यांचे दुकान असून सायकलीला आधुनिक करण्याचे काम ते गेल्या 25 वर्षापासून करत आहेत.

डब्बल चैन ची बनवली सायकल

फारुख सय्यद सांगतात की, सायकलचा दोन्ही बाजूने चैन बसवण्याचे काम फारच अवघड असते. ते मी करत असल्याचे ते सांगतात. सायकलच्या दोन्ही बाजूला चैन बसवण्याचे काम फारच अवघड असते. ते सहजासहजी होत नाही. डब्बल चैन बसवण्याचे काम झाल्याशिवाय मलाही झोप येत नाही. सायकलला दोन्ही बाजूने चैन बसवल्यास सायकलिंग करत असलेल्या व्यक्तीला सायकल चालवल्यास सोपी जाते. सायकल अतिशय हलकी होते. फारुख सय्यद यांनी बनवलेल्या सायकलवर सायकलिंग करणारे विद्यार्थी अनेक ठिकाणी जावून आले आहेत. त्यावेळी त्यांचा अनुभव त्यांनी त्यांच्या जवळ कथन करताना सांगितले की, डब्बल चैन मुळे सायकल चालवण्याास सोपी गेली. चढाचे अंतर सहज पार करता आले.





15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मोफत दिली जाते सेवा

फारुख सय्यद यांना देशाच्या प्रती प्रेम असून ते 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ग्राहकांना मोफत सायकल रीपेरिंग करून देतात. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची अनेजणांनी दखल घेऊन त्यांचा सन्मान केला आहे.

फारुख सय्यद यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मामांची मदत

फारुख सय्यद यांची परस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी त्यांच्या मामांनी मदत केली असल्याचे ते सांगतात. फारुख सांगतात की, जे सायकल कंपन्यांना जमले नाही ते मी करून दाखवले आहे. आजपर्यंत सायकल कंपन्यांनी फक्त अपंग लोकांसाठी सायकल तयार केली,पण एका हाताने किंवा एका हाताने अपंग असलेल्या लोकांसाठी सायकली बनवल्या नाहीत. अशा लोकांसाठी फारुख यांनी विशेष सायकली बनवल्या आहे. त्यांच्याकडे अपंग लोकांच्या सायकली बनवण्याची मागणी वाढली आहे.

कोरोना लॉकडाऊनचा सायकल व्यवसायावर परिणाम

कोरोनामुळे लॉक डाऊन झाल्याने सायकल व्यवसायावर परिणाम झाला आल्याचे फारुख सय्यद सांगतात. लॉक डाऊन काळात शिल्लक असलेला पैसा संपला. त्यामुळे लॉक डाऊन उघडल्यानंतर सर्व व्यवसाय सुरळीत चालू झाले,पण सायकल व्यवसायावर परिणाम झाला आहे. ग्राहक कमी झाले आहेत. या काळात शाळा ही बंद होत्या,त्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला. आता हळूहळू सायकल रीपेरिंगचा व्यवसाय पूर्वपदावर येवू लागला आहे.

Updated : 7 Jun 2022 1:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top