सावित्री उत्सव :स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्रीआई -अर्चना झेंडे
X
मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे.सावित्रीबाई फुलेंनी बहुजन मुलीच्या शिक्षणाचा पाया घातल्यामुळे आज समाजातील अनेक मुली शिकू शकल्या अगदी स्त्रिया व्यावसायिक समाजसेवेमध्ये सुद्धा आज कार्यरत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातून पी.एचडी. साठी संशोधन करत आहे.
सावित्रीबाई फुलेंनी बहुजन मुलीच्या शिक्षणाचा पाया घातला म्हणून मी इथपर्यंत शिकू शकले. एम.एस.डब्ल्यू.चे शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक समाजसेवेच्या क्षेत्रात बहुतेक सारी वर्षे स्त्रीयांसोबत काम केले. जगण्याच्या धडपडीत बायकांच्या वाट्याला आलेल्या दुय्यम स्थानाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी स्त्री अभ्यास केंद्रातून पुन्हा नव्याने शिक्षण घेतले आणि आता संशोधन करत आहे. स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या सावित्री आईचा वारसा मी पुढे चालवत आहे याचा मला अभिमान आहे.
त्यांनी दाखवलेल्या वाटेवर अधिकाधिक मुलींनी चालावे यासाठी ३ जानेवारी हा सवित्रिबाईंचा वाढदिवस मी मोठ्या प्रेमाने आणि कृतज्ञतेने साजरा करणार आहे. कपाळावर सावित्रीबाईंसारखी चिरी रेखणार आहे, दारात रांगोळी घालणार आहे, आणि उंबऱ्यावर पणती उजळून ज्ञानज्योतीची आठवण जागवणार आहे.
आपण सावित्रीच्या सर्व लेकींनी इतके तरी केलेच पाहिजे.
अर्चना झेंडे