Home > पर्सनॅलिटी > सावित्री उत्सव : मला अभिमान आहे ,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला-चिन्मयी सुमीत

सावित्री उत्सव : मला अभिमान आहे ,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला-चिन्मयी सुमीत

सावित्री उत्सव : मला अभिमान आहे ,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला-चिन्मयी सुमीत
X

मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. महाराष्ट्रातील सर्व महिलांना अभिमान असायला हवं की त्यांनी ज्योतिबा सावित्री बाई यांच्या भूमीत जन्म घेतला. आज प्रत्येक स्त्री अभिमानाने जगू शकते ही यांच्यामुळे. अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सावित्री उत्सव

३ जानेवारी २०१९

मला अभिमान आहे,मी भारतीय असण्याचा,मला अभिमान आहे मी भारतीय स्त्री असण्याचा आणि मला अभिमान आहे की,ज्योतिबा सावित्रीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला.

आज माझ्या समाजा मध्ये मी मनुष्य म्हणून ताठ मानेने जगू शकते, माझी स्वतःची ओळख बनवू शकते कारण मी सुशिक्षित आहे.आणि मी जे शिक्षण घेऊ शकले ते केवळ सावित्री बाई फुले यांच्या मुळे,त्यांच्यामुळे माझी नाळ सतत सावित्री बाईंशी जोडली आहे याची जाणीव असते.

3 जानेवारी हा सावित्री बाईचा जन्म दिवस हा दिवस मी सणा सारखा साजरा करणार आहे.मी माझ्या उंबऱ्यावर त्यांच्या नावे एक पणती लावणार आहे.दारात आकाश कंदील लावणार आहे आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणार आहे......

चिन्मयी सुमीत

अभिनेत्री

Updated : 1 Jan 2019 9:43 AM GMT
Next Story
Share it
Top