Home > मॅक्स किसान > असे कराल जलसंवर्धन?

असे कराल जलसंवर्धन?

असे कराल जलसंवर्धन?
X

“जल हेच जीवन” या उक्ती नूसार समूळ मानव जाती, शेती, प्राणी, पक्षी या सर्वांच्या अस्तित्वासाठी पाण्याचे महत्व हे अनण्यसाधारण आहे. जगभरात दुषीत पाणी हे भारतीय जनतेला मिळतं. आताही 70 टक्के जनता ही भू जलातील पाण्यावर अवलंबून आहे. करोडो रुपये खर्च करुन सुध्दा दरवर्षी दुष्काळ व टॅकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागतो. याच गतीने वाटचाल राहिली तर 2030 पर्यंत महाराष्ट्राचे वाळवंटीकरण होण्यापासून आपण रोखू शकणार नाही.

शासन स्तरावरुन होणा-या उपाय-योजना या व्यतिरिक्त सामान्य नागरीक म्हणून आपण काय करु शकतो व वसुंधरेचे विश्वस्थ कसे होऊ शकतो. यासाठी जलचक्र पाऊस, भूजल पाण्याचे संकलन हे समजून घेणे आवश्यक आहे.

जलचक्र :

समुद्र, नदी, सरोवर यांच्यावर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा किरणातील उष्मा द्वारे पाणी तापत व त्याचे बाषीभवन होत ही बाष्पयुक्त हवा वजनाने हलकी असल्याने आकाशात जाते. आकाशात बाष्पयुक्त कण एकत्र येवून ढग बनवतात. या ढगातील बाष्प कणाचे संकलन होत ते थंड झाल्यामुळे पूढे हे बाष्पाचे कण संकलीत होवून पाण्याच्या थेंबात बदलतात. ढगाची या थेंबाना रोखून धरण्याची शक्ती संपली की थेंब पाऊस रुपात खाली येतात व हेच चक्र “जलचक्र" म्हणून ओळखल्या जाते.

भारतात पाऊस देणारे मान्सून वारे हे दक्षिण - पूर्व व उत्तर - पूर्व मान्सून म्हणून ओळखले जातात. यवतमाळात अंदाजे 850 ते 900 मी.मी. पाऊस पडतो. स्कायमेट या हवामान अंदाज देणाऱ्या संस्थेनुसार यंदा 93 टक्के मान्सून होण्याची शक्यता आहे. यावरही जून व जुलै महिन्यात मान्सून कमकुवत राहिल. म्हणजेच पाण्याचे दुभाष्य व शेतीसाठी दुष्काळाचे पघडम. मान्सून म्हटला की अल निनो (स्पॅनीश शब्द याचा अर्थ लहान मुल) चा इफेक्ट आपल्यात नेहमीच ऐकायला मिळतो. मुळतः प्रशांत महासागरावर विणू वृत्तीय भागातील तापमान हे नेहमी पेक्षा जास्त असतं. पाणी हे जमिनीपेक्षा थंड किंवा गरम होण्याबाबतीत सुस्त असतं. महासागर व भूभाग तुलना या तापमानातील फरकामुळे तयार होणा-या बाष्पयुक्त मान्सून वा-याची गती तसेच गुणवत्तेवर परिणाम होतो व याचा परिणाम भारता सोबतच इंडोनेशिया व थेट ऑस्ट्रेलिया पर्यंत होतो. भारतात मान्सून ची सुरुवात केरळ पासून होते. तापमानामुळे हवेच्या दाबातील फरकामुळे मान्सून समोर सरकत हिमालय पर्वत रांगा पर्यंत जातो व तिथे अडतो.

या दरम्यान भुभागावरील तापमान व इतर अनेक गोष्टीवर पाऊस पडणे अवलंबून असते. हिमालयात थंड झालेले वारे, वायू दाबाच्या फरकामुळे परतीचा प्रवास सुरु करतात. बंगालच्या उपसागारावरुन काही प्रमाणात बाष्पयुक्त वारे वाहतात. या वाऱ्यापासूनही काही प्रमाणात पाऊस पडतो.

| अनेकदा कृत्रीम पावसाला दुष्काळावरील उपाय म्हणून बघितल्या जाते, त्यामध्ये काही प्रमाणात क्षार फवारल्यामुळे बाष्पाचे संकलन होण्यास मदत होते. पाऊस पडतो. परंतू ही प्रक्रीया मानवाच्या नियंत्रणात नसते. कमी उंच ढगावर सोडीयम क्लोराईड व जास्त उंचीच्या ढगावर सिल्हर आयोडोईड चे कण फवारतात. योग्य ढग शोधण्यासाठी रडार तसेच ढगापर्यंत पोहचण्यासाठी सुसज्ज विमान व ढगामध्ये कण फवारण्यासाठी नळ कांडयाची गरज असते. त्यामुळे तो हमखास उपाय म्हणून ठरत नाही.

भूजल

जमिनी खालील पाण्याच्या साठ्याला भूजल म्हणतात. माती, मुरुम व त्याखालील खडकामध्ये हे पाणवठे अक्विफर आढळतात. याचे उबळ व खोल अक्विफर असे वर्गीकरण करतात. जमिनीच्या आत पाणी तयार होत नसतं. भूजल हे वर्षा नुर्फ पावसाचं संकलित पाणी असतं. 100 थेबा पैकी पाण्याचा ठेवा पैकी 25 ठेव वाहून जातात 35 ठेवीची वाफ होते व 10 ठेव उथळ अक्विफर पर्यंत पोहोतात. खोल अक्विफर पर्यंत पोहोचण्यास अनेक दशकांचा कालावधी लागतो. आपल्या भागातील खडकात आकार मानाच्या केवळ 1 ते 3 टक्के पाणी जमा होवू शकते. कारण तो भाग भरीव आहे व त्यात बुडलेले भेगाचे प्रमाण कमी आहे. पृथ्वीच्या गर्भात आपण जसे जसे खोल जातो तसे तसे तापमान व दाब वाढत जातो. या परिस्थितील पाणी हे द्रव रुपात राहिल हे शक्य नसतं त्यामुळेच बोअरवेल खोदली की पाणी जास्त लागेल हा अट्टाहास चुकीचे आहे.

पाण्याचे संकलन काळाची गरज

दिवसें दिवस कमी होणारा पाऊस, पाण्याची वाढलेली गरज यावर आपल्या हातात असलेला उपाय म्हणजे असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व जलस्त्रोताचे पुर्नभरण.

पाण्याच्या संकलनाचे दोन प्रकार करता येतील.

1 सांडपाणी 2 पावसाचे पाणी.

सांडपाण्याचे संकलन करण्यासाठी अंघोळ, कपडे धुण्याचे पाणी, एका पाईप मध्ये जोडून ते मॅजिक पिटमध्ये टाकावे, यामध्ये आपण जमिनीत 6 फूट खोल खड्डा करतो. त्यात एक गोल सिमेंट ची टाकी ठेवावी. वरील 1 फुटा मध्ये 8 छिद्र करावे. गड्डा व टाकी मधील जागा गिट्टी किंवा रेती ने भरावा. टाकीत काहीही टाकू नये. संकलीत केलेले पाणी पाईपद्वारे टाकीत सोडावे असलेला गाळ खाली बसतो व तुलनात्मक हलके पाणी जमिनीत मुरते काही वर्षांनी टाकी स्वच्छ करता येईल. टाकीला वरुच्या बाजूने झाकन करावे. मुख्य स्त्रोत तसे विहिर, कुंपनलिका या पासून शक्य तितक्या दूर हा मॅजिक पीट करावा. एका माणसाला दिवसाला 150 लि. पाणी लागतं. वर्षभरात एका कुटुंबाला (4 जणांना) 1.5 ते 2 लाख. लीटर पाणी लागतं. यापैकी साधारण 1 लाख लिटर पाणी मॅजिक पिट द्वारा संकलीत करता येईल. पावसाच्या पाण्याचे संकलन व स्त्रोताचे पुर्नभरण या दोन प्रकारे करता येतील.

1 डायरेक्ट रेन वॉटर हारवेस्टींग

2 इनडायरेक्ट रेन वॉटर हारवेस्टींग.

सरळ रेन वॉटर हारवेस्टींगमध्ये छतावरील पाण्याचे संकलन एका पाईप मध्ये जोडावे - त्या पाईप ला फिल्टर मिडीया लावावा. यात मुळत: जाळी, रेती, कोळसा, स्पंज याचा वापर करुन पाण्याच्या स्त्रोत जसे विहीर, बोअरवेल यात सोडता येईल. या पद्धतीद्वारे अक्विफरचे लवकर पुर्नभरण शक्य आहे. ही पध्दत विहिर पुर्नभरणासाठी फार उपयोगी आहे.

इनडायरेक्ट रेन वॉटर हारवेस्टींग” या पद्धतीत जलस्त्रोताजवळ एक 6X6x6 चा गड्डा केला जातो. त्यात प्रथमतः गीट्टी, रोडा टाकावा. पाईप गड्याच्या मधील भागात एल्बो द्वारे सोडावा. गिट्टी चे प्रमाण 2/3 असावे. गड्डा हा सछिद्र भितीने बांधला असल्यास उत्तम खालील भागात बेड कॉक्रीट टाकू नये व वरुन झाकण करावे.

रेन वॉटर हारवेस्टींग करताना आपण 1000 फुट छतावर अंदाजे 90 हजार लि. पाण्याचे संकलन करु शकतो. त्यासाठी सहसा पाईप 75 मी.मी. व्यासाचे असावेत व प्लंबरकडून जोडणी करुन घ्यावी. रेन वॉटर हारवेस्टींग करताना छताची काळजी घ्यावी, डबे, कुलर किंवा कचरा छतावर ठेवू नये. छत व्यवस्थीत झाडून घ्यावे, पाळीव प्राण्यांची माडीवर विष्टा पडणार नाही. याची काळजी घ्यावी. पाईपच्या एल्बोला जाळी बसवून घ्यावी. डायरेक्टपध्दतीमध्ये पहिल्या पावसाचे पाणी सोडू नये. बोअरवेलमध्ये संपूर्ण केसींग करण्यास आग्रही राहा.

भूजल प्रदुषण ही एक अशक्यप्राय समस्या होवू शकते. त्याची नैसर्गीक कारणे म्हणजे खडकात असलेला लोह, मॅग्नेशीयम, आर्सेनीक, प्लोराईड. भारतात आर्सेनिक व फ्लोराईड युक्त पाण्यामुळे अनेक लोक बाधीत झाले आहे. मानव निर्मीत कारणांमध्ये साठवलेला कचरा व डपिंग ग्राऊडमधून प्रदूषीत पाणी जमिनीत जाणे उद्योगाचे पाणी जमिनीत मुरणे किंवा मुद्दाम सोडणे, गटारी, मैला पाणी जमिनीत मुरवणे रासायनिक खते व किटकनाशकांचे अंश तसेच कारखान्यामुळे घातक खनिजे व गळतीमुळे खनिज तेल भूजलात जाते. भूजल प्रदुषण यावर उपाय भौगोलिक विविधतेमुळे खूप कठीण आहे. त्या वरील तो होवू न देणे खबरदारी चा उपाय घेणे आवश्यक आहे.

Updated : 29 July 2019 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top