Home > मॅक्स रिपोर्ट > पगार घटला, बेरोजगारी वाढली, वाचा धक्कादायक रिपोर्ट

पगार घटला, बेरोजगारी वाढली, वाचा धक्कादायक रिपोर्ट

देशातील बेरोजगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे अनेक अहवाल येत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला अनेकांचा पगारही घटत असल्याचा धक्कादायक अहवाल बेटरप्लेस या संस्थेने दिला आहे. नेमकं काय आहे या अहवालात जाणून घेऊयात....

पगार घटला, बेरोजगारी वाढली, वाचा धक्कादायक रिपोर्ट
X

फ्रंटलाईन वर्कफोर्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म असलेल्या बेटरप्लेसने आपला अहवाल जारी केला आहे. त्यामध्ये मार्च 2023 पर्यंत देशात फ्रंटलाईन वर्कर्सच्या 17.5 टक्के नोकऱ्यांची संख्या घटल्याचे समोर आले आहे. 2022 मध्ये 80 लाख असलेल्या फ्रंटलाईन वर्करच्या संख्येत घट होऊन सध्या ही संख्या 66 लाखांवर आली आहे.


एकूण फ्रंटलाईन वर्करपैकी 66 टक्के फ्रंटलाईन वर्कर्स हे 20 ते 30 या वयोगटातील आहेत. तर 30 ते 40 वयोगटातील फ्रंटलाईन वर्कर हे 25 टक्के आहेत.


2023 मध्ये लॉजिस्टिक आणि मोबिलिटी हे क्षेत्र फ्रंटलाईन वर्कर्सला सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र म्हणून पुढे आले आहे. या क्षेत्राने ई कॉमर्स या क्षेत्राची नंबर वनची जागा घेतली आहे. 2022 मध्ये 21.45 टक्के असलेल्या लॉजिस्टिक आणि मोबिलिटी या क्षेत्राने फ्रंटलाईन वर्कर म्हणून 23.9 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यामुळे सध्या लॉजिस्टिक आणि मोबिलिटी या क्षेत्रात 45.35 टक्के फ्रंटलाईन वर्कर्सला नोकऱ्या मिळाल्या आहेत. तर ई-कॉमर्स क्षेत्र 70.12 टक्क्यावरून 33.08 टक्के इतकी घसरण झालीय.



IFM (Integrated Facility Management) and IT (Information Technology) या क्षेत्रात 16.22 टक्के, रिटेल आणि QSR (Quick Service Restaurant) या क्षेत्रात 2.21 टक्के आणि इतर क्षेत्रात 1.23 टक्के तर उत्पादन क्षेत्रात 0.85 टक्के फ्रंटलाईन वर्करची वाढ झाली.


लॉजिस्टिक आणि मोबिलिटी या दोन्ही क्षेत्राच्या माध्यमातून 111 टक्क्यांनी फ्रंटलाईन वर्करची मागणी वाढली. IFM आणि IT द्वारे तयार करण्यात आलेली मागणी 139 टक्क्यांनी वाढली. मात्र ई-कॉमर्सची मागणी 52 टक्क्यांनी कमी झाल्याचे समोर आले आहे.

2022 पेक्षा 2023 मध्ये महिला फ्रंटलाईन वर्करची ई-क़ॉमर्स क्षेत्रात मोठी मागणी आहे. ई-कॉमर्समध्ये 64.15 टक्के, आयटीमध्ये 4.37 टक्के, लॉजिस्टिक आणि मोबिलिटीमध्ये 2.13 टक्के, बीएफएसआय यामध्ये 7.85 टक्के, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये 0.45 टक्के, रिटेलमध्ये 4.26 टक्के तर इतर क्षेत्रात महिला फ्रंटलाईन वर्कर्सचे 16.80 टक्के इतकी मागणी आहे. मात्र ई-कॉमर्स, बीएफएसआय, आयएफएम आणि आयटी तसेच रिटेल आणि क्युएसआर या टॉप इंडस्ट्रीमध्ये 80 टक्के महिला फ्रंटलाईन वर्करची मागणी आहे.

फ्रंटलाईन महिला वर्करमध्ये 44 टक्के महिला या 20 ते 30 या वयोगटातील आहेत. तर 37 टक्के महिला या 30 ते 40 वयोगटातील आहेत.

फ्रंटलाईन वर्करच्या संदर्भात लिंग गुणोत्तराचा विचार केला तर 94 टक्के पुरुष आणि 6 टक्के महिला या फ्रंटलाईन वर्कर आहेत. यात 2020-21 मध्ये 29.8, 2021-2022 मध्ये 29.4 टक्के वाढ झाली आहे. ती वाढ 2023 मध्येही कायम आहे.




देशात 44 टक्के पदवीधर, 35 टक्के 12 वी पास. 12 टक्के 10 वी पास, 5 टक्के पदव्यूत्तर पदवी, 3 टक्के 10 वी च्या आत, 1 टक्के डिप्लोमाधारक फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करत आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत 41 टक्के महिला फ्रंटलाईन वर्कर या किमान पदवीधर आहेत.

फ्रंटलाईन वर्करपैकी स्कूटी, बाईक किंवा सायकल असलेल्यांचे प्रमाण फक्त 38 टक्के आहे. तर 62 टक्के फ्रंटलाईन वर्करकडे कुठल्याही प्रकारचे वाहन नाही. तर 69 टक्के फ्रंटलाईन वर्करकडे स्मार्टफोन असल्याचे या अहवालात समोर आले आहे.


देशभरातील एकूण फ्रंटलाईन वर्कर्सपैकी 55 टक्के महिला या आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातून येतात. तर त्यापैकी 81 टक्के महिला 20-40 या वयोगटातील आहेत. त्याबरोबरच 67 टक्के महिला या कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करतात.


61 टक्के पुरुष हे 20 ते 30 या वयोगटातील फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. त्यापैकी 51 टक्के हे पदवीधर किंवा डिप्लोमा धारक आहेत. यामध्ये 35 टक्के पुरुष हे उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील आहेत. मात्र यापैकी 48 टक्के पुरुष हे कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत आहेत.


यामध्ये सर्वाधिक पगार असणारा जॉब म्हणजे अकाऊंटंट, कस्टमर केअर, खरेदी-विक्रीतून मिळत असल्याचे समोर आले आहे.

स्थलांतरीत फ्रंटलाईन वर्करपैकी 67 टक्के फ्रंटलाईन वर्कर हे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील आहेत.


देशातील एकूण फ्रंटलाईन वर्कर्सपैकी 75 टक्के फ्रंटलाईन वर्कर हे बंगळूर, दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि हैद्राबाद या शहरात येतात.

फ्रंटलाईन वर्करच्या पगारात गेल्या वर्षभरात 4.5 टक्के घट झाली असल्याचं समोर आलं आहे. 2022 मध्ये 22 हजार 800 रुपये असलेला पगार 2023 मध्ये 21 हजार 700 रुपये इतका झाला. मात्र, महिलांबाबत इंडस्ट्रीच्या सरासरीच्या 20.5 टक्के इतका कमी पगार मिळतो.


लॉजिस्टिक आणि मोबिलिटी यात महिलांचे पगार 20 टक्के जास्त होते. तर उत्पादन क्षेत्रात 36 टक्के महिलांचा पगार जास्त होता. देशातील फ्रंटलाईन वर्कर्सपैकी 2022 च्या तुलनेत 165 टक्के लोकांनी नवे स्किल शिकण्यावर वेळ खर्च केला. त्याबरोबरच 37 टक्के महिलांनी रेग्युलर शिक्षणाव्यतिरीक्त ट्रेनिंग घेण्यावर वेळ खर्च केला.

देशातील एकूण फ्रंटलाईन वर्कर्सपैकी 56 टक्के मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटूंबियांनी नोकरीसाठी पाठिंबा दिला आहे. त्याबरोबरच 32 टक्के महिलांना काही प्रमाणात तर 7 टक्के महिलांना कुटूंबाचा पाठींबा आहे की नाही माहिती नाही. मात्र, एकूण फ्रंटलाईन वर्कर महिलांपैकी 16 टक्के महिला स्वाभिमानी होण्यासाठी आणि निर्णय घेता यावा यासाठी जॉब करतात.

कोणत्या क्षेत्रासाठी पगार किती ?

लॉजिस्टिक अँड मोबिलिटी या क्षेत्रात 26 हजार 200 रुपये सरासरी वेतन मिळते. तर आयटी क्षेत्रात 23 हजार 200 रुपये, बीएफएसआय या क्षेत्रात 22 हजार, उत्पादन क्षेत्रात 27 हजार रुपये वेतन मिळते. मात्र हे वेतन 2022 च्या तुलनेत घसरल्याचे बेटरप्लेसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.





Updated : 27 Sep 2023 12:09 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top