Home > मॅक्स रिपोर्ट > गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला "राईट टू लव्ह"ची नोटीस

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला "राईट टू लव्ह"ची नोटीस

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना घरच्यांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार असा ठराव करणाऱ्या नानव्हा गावचे सरपंच सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना राईट टू लव्ह संस्थेने कायदेशीर नोटीस पाठवली आहेत.

गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला राईट टू लव्हची नोटीस
X

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात प्रेम विवाहाला विरोध करण्यासारख्या घटना वाढत आहेत. आम्ही "राईट टू लव्ह" या संघटनेतर्फे या घटनेचा कडाडून निषेध करत आहे. नाशिक जिल्ह्यातील प्रकरण ताजे असतानाच, गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीनं देखील आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या प्रेम विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे.

असा बेकायदेशीर आणि असंविधानिक ठराव करण्याचा ग्रामपंच्यायतीला कोणताच अधिकार नाही. आपलं संविधान आपल्याला जोडीदार निवडण्याचा अधिकार देतं. मग तो जोडीदार कोणत्याही जाती धर्मातला असला तरी...त्यात सरकारच्याही आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना असताना सदरच्या ठरवामुळे संविधानाने दिलेल्या अधिकारांचं उल्लंघन होत आहे. नानव्हा ग्रामपंचायतीने केलेला ठराव बेकायदेशीर असल्यामुळे आम्ही आमच्या राइट टू लव्ह या संघटनेमार्फत नानव्हा ग्रामपंचायतीस कायदेशीर नोटिसी पाठवली असून सदर ठराव नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितले आहे तसेच नोटीस नमूद कालावधी मध्ये ठराव रद्द न केल्यास ग्रामपंचायतीच्या सर्व सभासदांवर व अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाईची करणार असल्याचे कायदेशीर सल्लागार ॲड. वैभव चौधरी आणि राईट टू लव्हचे के. अभिजीत यांनी सांगितले.

Updated : 23 Sep 2023 8:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top