Home > मॅक्स रिपोर्ट > इंधन दरवाढीमुळे होतेय रिक्षा चालकांची दैना

इंधन दरवाढीमुळे होतेय रिक्षा चालकांची दैना

इंधन दरवाढीमुळे होतेय रिक्षा चालकांची दैना
X

गेल्या काही काळात देशात महागाईने उच्चांक गाठलाय. या महागाईविरोधात कॉंग्रेसनं एक मोठं देशव्यापी आंदोलनदेखील केलं. समाजातील विविध घटकांना या महागाईचा फटका बसू लागला आहे. त्यात सर्वाधिक चर्चा इंधन दरवाढीची होतेय. रिक्षाचालकांना देखील या इंधन दरवाढीचा फटका बसू लागला आहे. अशाच एका मुंबईतील रिक्षा चालकाचा माग मॅक्स महाराष्ट्रने घेतला.

मुंबईतील रिक्षाचालक युसुफ अन्सारी यांनी मोठ्या कष्टाने उमेदीच्या काळात स्वतःची रिक्षा घेतली आणि आपल्या कुटूंबाचा रहाटगाडा हाकू लागले. युसूफ हे मुंबईत लोकमान्य टिळक टर्मिनस परिसरात रिक्षा चालवतात आणि आपला उदरनिर्वाह करतात. पण सध्या वाढत्या CNG दरांचा त्यांनादेखील फटका बसतोय.

या इंधन दरवाढीचा फटका त्यांच्या फक्त घर खर्चालाच बसतोय असं नाही तर मुलांच्या शैक्षणिक खर्चावर देखील याचे परिणाम होऊ लागले आहेत. या इंधन दरवाढीमुळे त्यांच्या दैनंदीन आयुष्यावर आता विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. आधीच भाड्याच्या घरात राहणाऱ्या युसुफ यांच्या घरात आता अन्नधान्याचा तुटवडा पडू लागला आहे.

इंधन दरवाढीचा फटका बसलेले युसूफ हे काही एकटे रिक्षाचालक नाहीत. इतरही रिक्षाचालकांची देखील सारखीच अवस्था आहे. रिक्षाचाल युसूफ यांचं म्हणणं जर आपण व्यवस्थित ऐकलं असेल तर रिक्षाचं जे प्रवासी भाडं आहे त्यात देखील वाढ होणार असल्याचं ते म्हणतात. पण ही दरवाढ जर झाली तर ही सर्वसामान्यांची हक्काची रिक्षा त्यांना परवडण्या जोगी राहणार नाही असं ते सांगतात. या सर्व दरवाढीमुळे जर या प्रवाशांनी वेगळा मार्ग निवडला तर रिक्षाचालकांना फार मोठा फटका बसणार असल्याची भावना या सर्व रिक्षाचालकांमध्ये आहे.


Updated : 10 Aug 2022 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top