Home > मॅक्स रिपोर्ट > आरसीएफ मधील नोकर भरती स्थानिक,भुमिपुत्रांना प्राधान्य: प्रविण दरेकर

आरसीएफ मधील नोकर भरती स्थानिक,भुमिपुत्रांना प्राधान्य: प्रविण दरेकर

आरसीएफ मधील नोकर भरती स्थानिक,भुमिपुत्रांना प्राधान्य: प्रविण दरेकर
X

आर.सी.एफ. कंपनीच्या थळ प्रकल्पातील नोकर भरतीसाठी उमेदरावारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ करण्यात येणार असून उमेदवारांच्या पात्रतेचे निकषही बदलण्यात येणार आहेत, तसेच या नोकर भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना, स्थानिकांना व भुमिपुत्रांना प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज दिली.

आर.सी.एफ. चे व्यवस्थापकीय संचालक मुडगेरीकर यांची विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज चेंबूर येथील आरसीएफ कार्यालयात भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, आर.सी.एफ. च्या स्थापनेपासूनची होणारी ही सर्वात मोठी भरती आहे. त्यामुळे जे प्रकल्पग्रस्त आहेत. ज्यांनी जागा व जमिनी दिल्या आहेत. त्या प्रकल्पग्रस्तांना, स्थानिकांना व भुमीपुत्रांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्याची आमची मागणी आहे.

आजच्या चर्चेत आर.सी.एफ. RCF मुडगेरीकर यांनीही आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांनी आम्हाला आश्वस्त केले की, ज्या जागांकरिता भरती आहे, त्यासाठी स्थानिक जर त्या क्षमतेचे नसतील तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून काही दिवसांमध्ये आम्ही त्यांना त्या जागांसाठी तयार करुन आणि नोकरीत त्यांना सामावून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करु असे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच भरतीसाठी आधी परिक्षेचा निकाल ३१ जून ग्राह्य धरणार होते, तो वाढविण्यात आला आहे. ज्यावेळी पदांसाठी मुलाखत होईल.

जुलै मध्ये मुलाखत झाल्यास ते ग्राह्य धरणार आहेत. याआधी ३१ जुनची त्यांनी जाहिरात दिली होती. मात्र, ही परिस्थिती कोविडची आहे त्यामुळे ज्यावेळेस मुलाखत होईल. त्यावेळचे सर्टीफिकेट जुलैनंतरचेही ग्राहय धरल जाईल. अशा प्रकारचा एक निर्णय आज त्यांनी घेतला. उमेदवराच्या वयाची अटसुध्दा पूर्वी २५ वयोवर्षाची होती. त्यांनी ही वयाची अट २ वर्षांनी वाढवून २७ वयवर्षापर्यंत करण्यास मुभा दिलेली आहे. अशा तीन गोष्टी या ठिकाणी त्यांनी मान्‍य केल्या आहेत.

रायगड भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते व प्रकल्पग्रस्त हे सगळे नेतेमंडळी गेल्या अनेक दिवसापासून या विषयावर सातत्याने लढा उभारत आहेत आणि निश्चितपणे आर.सी.एफ. सकारात्मक भुमिका घेईल अशी अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी आम्ही यासंदर्भात आजच्या चर्चेदरम्यान व्यवस्थापकीय संचालकांशी बोलणे करुन दिले. फडणवीस यांनी या खात्याचे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्या स्तरावर नोकरभरतीमध्ये काही शिथीलता हवी आवश्यक असेल तसेच नियमावलीमध्ये बदल आवश्यक असल्यास विरोधी पक्ष नेते फडणवीस यामध्ये केंद्रिय मंत्र्यांशी चर्चा करतील असेही दरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

आजच्या बैठकीला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष ॲड. महेश मोहिते, अलिबागचे तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतीश लेले आणि संतोष म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

Updated : 14 July 2020 4:25 PM GMT
Next Story
Share it
Top