Home > मॅक्स रिपोर्ट > राज्यसभेचे उपसभापतीपद वंदना चव्हाण यांच्याकडे?

राज्यसभेचे उपसभापतीपद वंदना चव्हाण यांच्याकडे?

राज्यसभेचे उपसभापतीपद वंदना चव्हाण यांच्याकडे?
X

राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उपसभापती पदाच्या निवडणूकीची घोषणा केली आहे. ही निवडणूक ९ ऑगस्ट रोजी होणार असून या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपली रणनीती ठरविण्यात सुरुवात केली आहे.

या निवडणुकीसाठी उमेदवाराला आपला अर्ज ८ ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत दाखल करता येईल तर गुरुवारी सकाळी या निवडणुकीसाठी सकाळी ११ पासून मतदान होईल. काँग्रेसचे उपसभापती पी. जे. कुरियन हे निवृत्त झाल्यापासून राज्यसभेचे उपसभापतीपद रिक्त आहे.

दरम्यान राज्यसभेत भाजपचे बहुमत नाही. त्यामुळे विरोधकांनी जर मताचे विभाजन न करता एकीने उमेदवार दिला तर विरोधकांकडे उपसभापती पद जाऊ शकते. मात्र त्यासाठी विरोधकांची एकजुट होणे गरजेचे आहे.

कोणाची नावे चर्चेत?

विरोधकांच्या झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण, द्रमुकचे नेते तिरुची शिवा यांची नावे उपसभापतीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून चर्चिली गेली. मात्र विरोधकांकडून खासदार वंदना चव्हाण यांचे नाव निश्चित समजले जात आहे.

तर इकडे एनडीएचे जदयूतर्फे ज्येष्ठ पत्रकार राज्यसभा खासदार हरिवंश यांचे नाव राज्यसभेच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

Updated : 7 Aug 2018 1:10 PM IST
Next Story
Share it
Top