राज ठाकरेंची टीका भाजपच्या जिव्हारी लागलीय
X
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील हरिसाल इथल्या डिजीटल विकासाची पोलखोल सोलापूर इथल्या सभेत केली. त्यानंतर आता भाजपनं हरिसाल इथल्याच ग्रामस्थांच्या मुलाखती घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. विकास झाला नसता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला इतकं घवघवीत यश कसं मिळालंय, याचं उत्तर राज ठाकरेंनी शोधावं, असा सल्ला शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिलाय. त्यामुळं राज ठाकरेंची टीका ही भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागल्याची चर्चा सुरू झालीय.
राज ठाकरेंनी सभांमध्ये पुराव्यासह चित्रफिती दाखवण्याची प्रथा सुरू केलीय. आता त्यापुढे जाऊन राज यांनी चक्क पुरावा म्हणून माणसंच व्यासपीठांवर आणायला सुरूवात केलीय. त्याचाच प्रत्यय सोलापूरच्या सभेतही आला. या सभेत राज यांनी भारतातलं पहिलं डिजीटल गाव म्हणून चर्चा झालेल्या अमरावती मधल्या हरिसालच्या जाहिरातीत काम केलेल्या मनोहर खडके या युवकालाच व्यासपीठावर आणलं. मात्र, प्रत्यक्षात मनोहरला नोकरी मिळालेलीच नाही.
या वर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि भाजप सारवासारव करताना दिसत आहेत. Tv9 या वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना खोट ठरवत सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले. या पडताळणीत पुन्हा एकदा मुख्यमंत्री खोट बोलत असल्याचं समोर आलं.
मात्र आता भाजप कडून काही व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत. या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला राज ठाकरे यांचा आरोप व त्यानंतर हरिसाल मधे कसा विकास झाला हे सांगणारे गावकऱ्यांचे बाइट अस या व्हिडिओ चे स्वरूप आहे.
या वर बोलताना मनसेचे संदीप देशपांडे म्हणाले की, ज्या पद्धतिचे व्हिडिओ विनोद तावडे दाखवत आहेत या वरुन भाजप किती घाबरले आहेत हे दिसून येत. जे काही व्हिडिओ दाखवले आहेत भारतीय जनता पक्षाने दाखवले हे मॅनेज व्हिडिओ आहेत. या वरुन स्पष्ट दिसतय यांच्या बुडाखाली आग लागली आहे, असं मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केल आहे.
मग भाजपला मतं कशी मिळतात - विनोद तावडेंचा राज यांना प्रश्न
काल राज ठाकरे यांच्या टू इन टॉकीज चा शो होता. या शो मध्ये त्यांनी जुन्याच फ़िल्म दाखवल्या. जर योजना फसली असत्या जर आम्ही थापा मारल्या असत्या तर त्यानंतर झालेल्या सर्व निवडणुका ग्रामपंचायत महानगरपालिका या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपने जिंकत जाते आणि मनसे संपत जाते कारण काय योजनांचे फलित म्हणजे लोकांचे मत ग्रामपंचायत जिल्हापरिषद भाजपला देतात नगरपालिका भाजपला महानगरपालिका भाजपला देतात याचे उत्तर राज ठाकरे यांनी कुठेतरी शोधलं पाहिजे असं मत विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे.