Home > मॅक्स रिपोर्ट > सरकारने नुकसानीचा नाय, आमच्या इज्जतीचा पंचनामा केला, पुरग्रस्तांची संतप्त भावना

सरकारने नुकसानीचा नाय, आमच्या इज्जतीचा पंचनामा केला, पुरग्रस्तांची संतप्त भावना

राज्यात यंदा महापुरानं अनेक ठिकाणी वाताहत झाली. कोकणपट्टीतही मोठं नुकसान झालं. रायगडमधे झालेल्या महाप्रलयानंतर अनेक घोषणा झाल्या पण सरकारची तात्काळ मिळणारी मदत आहे कुठं? पूरग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित, बँकेने विमा नूतनीकरण न केल्याने व्यवसायिक, कर्ज खातेदारांवर उपासमारीचे संकटाचा धम्मशील सावंत यांनी केलेला ग्राऊंड रिपोर्ट.....

सरकारने नुकसानीचा नाय, आमच्या इज्जतीचा पंचनामा केला, पुरग्रस्तांची संतप्त भावना
X

रायगड जिल्ह्यासह सबंध कोकणात दि.21, 22 व 23 जुलै रोजी महाप्रलयकारी अतिवृष्टीने सर्वत्र महापूर आला होता. या महापुराचा सर्वाधिक फटका महाड व पोलादपूर तालुक्याला मोठ्या प्रमाणावर बसला.येथील नागरिकांच्या घरात, दुकानात पुराचे पाणी शिरून कोट्यवधींचे नुकसान झाले. राज्य सरकारने पूरग्रस्तांना तात्काळ तातडीची मदत जाहीर केली असली तरी अद्याप काही पूरग्रस्तांना मदत मिळालीच नाही असा संताप महाड बिरवाडी येथील पुरग्रस्तांनी व्यक्त केला. तर व्यापारी वर्गापुढे देखील जगण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.पूरग्रस्त बिरवाडी व एमआयडीसी येथील रहिवाशी असून बँक ऑफ महाराष्ट्र्र शाखा बिरवाडीचे व्यवसायिक खातेदार देखील आक्रमक झालेत.यावर्षी दि.21, व 22 जुलै रोजी महापुरात दुकानांचे नुकसान होऊन संपूर्ण बाजारपेठ उध्वस्त झाली.

बँकेकडे व्यवसायाचे कर्ज असल्यामुळे दुकानातील माल बँकेने तारण म्हणून घेतला होता म्हणून बँकेने आमच्या मालाचा विमा उतरवून दरवर्षी विमा नूतनीकरण करत असे, व बँक खात्यातून हफ्ता रक्कम वजा करीत असे, मात्र यावर्षी 2021 करीता बँकेने हलगर्जीपणा करून विमा नूतनीकरण केले नाही, परिणामी व्यवसायिकांना फ्युचर जनरली या विमा कंपनीने विमा दावा नाकारला आहे, त्यामुळे व्यवसायिक व व्यापारी वर्गाचे दुहेरी नुकसान झाले आहे. यासंदर्भात बँक कार्यालये, विमा कार्यालये, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अर्ज व पाठपुरावा करूनही दाद मिळत नसल्याचा संताप पुरग्रस्तांनी व्यक्त केलाय.

पूरग्रस्तांना कोणतीही नुकसान भरपाई न मिळाल्याने दुकाने आजही बंद आहेत. कोरोना महामारीत व्यवसाय ठप्प होते, मात्र आता मदत न मिळाल्याने आमच्यापुढे आत्महत्या करण्या पलीकडे पर्याय नाही. बँक ऑफ महाराष्ट्र्र यांनी फ्युचर जनरली विमा कंपनीकडून विमा दावा मंजूर करून घ्यावा, बँक दावा मंजूर न केल्यास बँकेने सध्याचे शिल्लक कर्ज माफ करावे व दाव्याच्या रकमेतून उरलेली रक्कम आम्हाला रोख द्यावी अशी मागणी घेऊन व्यापारी व पुरग्रस्तांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. यासंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र्र शाखा प्रबंधक संजीवकुमार यांनी सांगितले की व्यापारी पूरग्रस्तांना मदत मिळावी या प्रयत्नात आम्ही आहोत, हा विषय आम्ही वरिष्ठ शाखेच्या मध्यस्तीने सोर्ट आऊट करीत आहोत.असे सांगितले.

यावेळी बेमुदत उपोषणास बसलेल्या सुधीर सोनार यांनी मॅक्स महाराष्ट्र्र जवळ आपली भूमिका मांडताना म्हटले की आम्ही बँक ऑफ बिरवाडी चे कर्जखातेदार आहोत, बँकेने हलगर्जीपणा केल्यामुळे आम्हा सर्वांचे मोठे नुकसान झालेय,आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहोत, आम्ही इथे बसलेले सर्व जे व्यापारी आहोत ते बँक ऑफ महाराष्ट्र बिरवाडी यांचे कर्ज खातेदार आहोत. उपोषणाचे मुख्य कारण म्हणजे बँकेचा पूर्णपणे केलेला हलगर्जीपणा आमच्या सर्व व्यावसायिक कर्ज असल्यामुळे बँक आमच्या मालाचा, आमचा माल बँकेला तारण केले असल्यामुळे बँक त्याचा दरवर्षी विमा उतरवाचची आणि ॲटो डेबिटच्या माध्यमातून इएमआय ची जी रक्कम होती, ती आमच्या अकाऊंट मधून ती वजा करायची परंतु मागच्यावर्षी बँकेने पूर्णपणे गोंधळ घातल‍ा आहे, यामध्ये काय झालं त्यांनी आमची पॉलिसी रीन्युवल केली नाही. परिणामी काय झालं की जे महाड तालुक्यामध्ये दि. २१,२२,२३ तारखेला जो महापूर आलेला आहे. या महापूरामध्ये आमच्या सर्व व्यापाऱ्यांचे आतोनात मोठे नुकसान झाले, आणि त्या‍ नुकसान भरपाईची रक्कम आम्हाला भेटावी म्हणून आम्ही विमा दाव्याकडे एक चांगला वकील आणून पाहिला परंतु जेव्हा विमादावा मिळण्यासाठी आम्ही कंपनीला अर्ज केला, तेव्हा कंपनीने पूर्णपणे आमचा विमादावा नामंजूर केला आणि आम्हाला असे सांगितले गेले की बँकेने तुमची पॉलिसी यावर्षी म्हणजे २०२१ साली रीन्युवल केली नाही. आणि त्यामुळे केवळ बँकेच्या चुकीमुळे आमचा विमादावा हा नामंजूर झाला आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही आहे.याला बँक ऑफ महाराष्ट्र्र जबाबदार आहे.

आंदोलनातील आणखी एका कर्ज खातेदाराने सांगितले की आम्ही बँकेच्या विरोधात खूप काही केलं, खर तर लोकप्रतिनीधी असतील किंवा प्रशासनातील जिल्हाधिकारी, तहसिलदार आहेत , यांच्याकडे वारंवारं आम्ही ही विचारणा केली किंवा अर्ज केले. ३ महीने झाले आम्हाला कसलीच मदत मिळाली नाही, त्याच्यामुळे आम्ही आता हातबल झालो आणि आता आम्ही उपोषणाला बसलोय आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण करणार आहोत.

यावेळी उपोषणास बसलेल्या आंदोलकाने मॅक्समहाराष्ट्र जवळ बोलताना सांगितले की सरकारच्या मदतीचा विषय वेगळा राहिला, पण आता बँकेचा पण अस आहे की आम्ही आज आता १०,१२, १५ वर्ष त्यांचे खातेदार आहोत. तर त्यांनी इंश्युरन्स कंपनिवर न ढकलता आम्हाला सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पुढच्या २ हजार ३ हजार ज्या ब्रँचेस आहेत, त्यातल्या एका दोन ठिकाणीच झाले, चिपळून आणि महाड या ठिकाणी त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, असा आमचा पहिला दृष्टीकोन आहे. कारण संसार तर उध्दवस्थ झाले, व्यावसाय उध्दवस्थ झालेत. बँका शासनाने मदत केलीच पाहिजे अशी अपेक्षा आहे.

यावेळी येथील पूरग्रस्ताने संतप्त होत मॅक्समहाराष्ट्र जवळ आपली भूमिका मांडली, ते म्हणाले ज्यावेळी पूर आला आणि जेव्हा आमचा पंचनामा करण्यात आला, खरोखर सांगतो सरकारने आमच्या इज्जतीचा पंचनामा केला आहे. कारण ज्यांनी पंचनामा केला त्यांना पहिलेच सांगीतले, आमचा पंचनामा करु नका जर आम्हाला सरकार मदत करणार असेल तर पंचनामा करा. व आमचा पंचनामा केला, आजपर्यंत कुठल्याच प्रकारचा निधी मिळाला नाही. माझ्या दुकानाच १ लाख १० हजाराचं नुकसान झालं फक्त पंचनामा झाला आजुनही रूपया मिळाला नाही काही नाही.

महापुरात शासनाने तातडीने जाहीर केलेली मदत न मिळालेल्या बिरवाडी येथील पूरग्रस्ताने सांगितले की सरकारने तात्काळ स्वरुपाची जी ५० हजाराची मदत जाहीर केली होती. अजूनही ५०-६० टक्के लोकांना मिळाली नाही, मला सुध्दा मिळाली नाही आहे, ती त्वरीत मंजूर करून जे-जे काही संबंधीत आहेत जी राहीलेली आहेत, त्यांना त्वरीत ५० हजार दयावे ही विनंती आहे.

यावेळी एका पूरग्रस्ताने सांगितले की महापुरात कमीत कमी १०-१२ लाखांच नुकसान झालंय, पण शासनान एवढं चालढकल पणा चालू केला आहे की अजून ५० हजार शासनाचे मिळाले नाही आहेत.

यावेळी बोलताना राहूल तुकाराम जाधव यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी आपली व्यथा मॅक्समहाराष्ट्र जवळ मांडली. माझ बँक ऑफ महाराष्ट्रा मध्ये खाते आहे. या खात्यामध्ये माझ 12 लाखाचे कर्ज आहे . माझी परिस्थिती अत्यंत बिकट झालीय. मी आता १८/१०/२०१९ ला मी माझं दुकानाच उदघाटन केलं. दुकान उदघाटन केल्यानंतर २-३ महिन्यानंतर आम्हाला कोरोना लागला, कोरोनाशी झुंझत असताना कस तरी स्वतःला सावरत होतो, त्या माझी परिस्थिती खूप गरीब आहे.या गरीब परिस्थितीतुन स्वत:च्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. जवळजवळ या महापुरातआता माझ नुकसान म्हटलांत तर साडे तेरा लाखांच नुकसान झाल आहे. या महापुरामध्ये माझं नुकसान झालं तेव्हा मला एक आशा होती की बँकेने माझ्यासाठी इन्शुरन्स काढून ठेवलेला आहे.

कारण की प्रत्येकाला बँक इन्शुरन्स देते, आज कुठलाही व्यावसायिक कर्ज घेतात तेव्हा ते पहिले इन्शुरन्स घेतात. आज माझ्यावर एवढं मोठं संकट आहे की आता परत उभा राहायचं म्हटलं तरी अशक्य आहे. एक लिस्ट आणली इन्शूरन्स ची त्या लिस्टमध्ये जेव्हा मी बघितलं तेव्हा माझ नावंच नाही, त्या लिस्टमध्ये जेव्हा नाव नसताना मी बँकेचा जो मॅनेजर आहे त्यांच्याशी जेव्हा मी संपर्क साधला. या पुरामध्ये माझ भरपूर नुकसान झाल आहे, भरपूर काही वाया गेलेलं आहे. सार काही उध्वस्त झालं आहे, शाखा प्रबंधक यांनी सांगितले, तुमचं या लिस्टमध्ये नाव नाही तर आम्ही काही करू शकत नाही. मी आज गरिब आहे, माझी जात भटकी आहे, मी आज काय करावं मला एवढचं बँकेने सांगावं. असा संताप कर्जदाराने व्यक्त केला.

यावेळी आणखी एका कर्ज खातेदाराने मॅक्समहाराष्ट्र जवळ आपली कैफियत मांडली. ते म्हणाले आमचा प्रश्न घेऊन

आम्ही ज्यावेळी बँक ऑफ महाराष्ट्र्र मध्ये विचारणा केली . त्यावेळी बँकेने सांगीतलं तुमच्या पॉलीसी रिन्युवल नाहीत. आता पॉलीसी रिन्युवल करण्याची जबाबदारी ख-या अर्थाने बँकेची असते त्यांनी पॉलीसी रिन्युवल केल्या नाहीत, मग आम्ही झोनल ऑफीस त्यांच जे वाशीला आहे तिथे जाऊन वरिष्ठांना भेटलो त्यांनी आमच्या समोर इन्शुरन्स कंपनीला फोन लावला, आता इन्शुरन्स कंपनी बँकेशी टाईप असल्या कारणांने ऑल बँक ऑफ महाराष्ट्र एकच कंपनी आहे. त्याद्वारे सर्वांचा इन्शुरन्स केला जातो. इन्शुरन्स कंपनीला त्यांनी विचारलं यांचा इन्शुरन्स आम्हाला १५ दिवस आधी का सांगत नाही, इन्शुरन्स कंपनीच्या ऑफीसरने सांगीतल की आम्ही १५ दिवस आगोदर तुमची लिस्ट पाठवली आहे पण बँकेकडून ते काही रीन्युवल झालेले नाही. असे यावेळी उपोषणकर्ते यांनी मॅक्स महाराष्ट्र्शी बोलताना सांगितले.

येथील एका आंदोलनकर्ते व पूरग्रस्त असलेल्या नागरिकाने अस्वस्थ होत सांगितले की

माझ्याबाबतीत तर एवढ झालं की या बँकेच्या हलगर्जीपणामुळे पॉलीसी आहे, माझ्या नावाची आणि माझ्या पॉलीसीच इएमआय डेबीट झालं दुस-याच्या अकाऊंट मधुन, आणि आता मला ते पॉलीसीवाले बँकेच स्टेटमेंट मागत होते की तुमचा हप्ता जो डेबीट झाला आहे, त्याचा स्टेटमेंट दया, आता मी स्टेटमेंट देणार कुठून? माझ्या अकांऊट मधुन हप्ताच कट नाही झाला? हप्ता कट झाला दुस-याच्या अकांऊट मधून आणि पॉलीसी माझ्या नावाची त्यास्वरुपात बँकेचा लेटर दयायला तयार आहेत पण रजिस्टर क्लेम झाल पाहिजे , माझे पण क्लेम रजिस्टर करून घ्यायला तयार नाहीत.अशी गंभीर परीस्थिती आहे.

महापूरात उध्दवस्थ झालेले नागरीक आहेत, त्यांनी स्वत:ला सावरलेल आहे, परंतु मायबाप सरकारकडून जी मदत मिळणार होती ती मदत देखील आता बहूसंख्य लोकांना या ठिकाणी अजुन मिळालेली नाही आहे त्याबरोबर बँकाच्या ज्या त्रुटी आहेत इन्शुरन्समधील ज्याकाही कार्यवाही करण्याची गरज होती वेळीच बँकाकडून वेळीच न झाल्यामुळे आंदोलन करण्यात आले. नागरिक व्यापाऱ्यांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. मायबाप सरकार आमच्याकडे लक्ष देईल का बँक व्यवस्थापन आम्हाला न्याय देईल का या प्रतिक्षेत आणि भुमिकेमध्ये या ठिकाणी आंदोलनकर्ते असल्याचे दिसतयं.

Updated : 23 Nov 2021 7:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top