Home > Election 2020 > मोदी सरकारबाबतचं 'हे’ वक्तव्य, राहुल गांधींना भोवलं

मोदी सरकारबाबतचं 'हे’ वक्तव्य, राहुल गांधींना भोवलं

मोदी सरकारबाबतचं हे’ वक्तव्य, राहुल गांधींना भोवलं
X

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस देण्यात आलीय आहे. मध्य प्रदेशातील शहडोल इथं बोलताना राहुल गांधी यांनी ‘मोदींनी असा कायदा केला आहे की, ज्यानुसार आदिवासींना गोळ्या झाडल्या जाऊ शकतात.’ राहुल गांधींच्या या वक्तव्याबाबत भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर राहुल यांचं हे वक्तव्य आचार संहितेचं उल्लघन केलं आहे, असं म्हणत त्यांना निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.

या नोटिसला उत्तर देण्यासाठी राहुल यांनी 48 तासांचा कालावधी देण्यात आला आहे.

यापुर्वी राहुल गांधींना राफेल प्रकरणात केलेल्या वक्तव्याबद्दल कोर्टाची माफी मागावी लागली होती. राफेल प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी ‘चौकीदार चोर है’ असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं, असा दावा राहुल गांधी यांनी केला होता. पण आम्ही असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं स्पष्टीकरण सर्वोच्च न्यायालानं दिलं होतं. त्यानंतर राहुल यांनी न्यायालयाची माफी मागितली होती.

Updated : 2 May 2019 4:06 AM GMT
Next Story
Share it
Top