News Update
Home > Election 2020 > पुणे विद्यापीठाचा असाही पराक्रम

पुणे विद्यापीठाचा असाही पराक्रम

पुणे विद्यापीठाचा असाही पराक्रम
X

सतराव्या लोकसभेची निवडणूक पार पडताच देशातील नावाजलेल्या सर्वेक्षण संस्थांनी जनमत चाचणीचे कौल दिले आहेत. या एक्झिट पोलमध्ये विद्यमान एनडीए सरकारलाच जनतेची पसंती असल्याचं चित्र समोर आलं असताना पुणे विद्यापीठानं आपल्या नावाला जागत आपलाही एक्झिट पोल प्रसिद्ध करण्याचा भीम पराक्रम केला आहे. वास्तविक या पोलमधील आकडेवारी ही केवळ राज्यापुरतीच असून गेल्या निवडणूकीतील आकडेवारीची पुनरावृत्ती होईल, असं दाखवणारं धाडसी भाकित आहे, असं म्हणता येईल.

यासाठी विद्यापीठानं वापरलेली मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील असल्याचं म्हटलंय. तर सीएसडीएस - लोकनीती या संकेतस्थळावरून जनमानसांचा कल जाणून घेण्याचा त्यानी प्रयत्न केलाय. यामध्ये सध्याच्या सरकारच्या कामगिरीबद्दल असलेले लोकांचं मत, पंतप्रधानपदाच्या संभाव्य उमेदवाराची लोकप्रियता,मागील निवडणूकीत आपले मत यंदा बदलू इच्छिणारे मतदार या घटकांचा विचार केल्याचं विद्यापीठानं सांगितलंय.

हा एक्झिट पोल तयार करताना विद्यापीठानं रॅडम फॉरेस्ट मॉडेल वापरलं असल्याचं सांगितलंय. मात्र, विद्यापीठानं सांगितलेल्या एका घटकाचा जरी विचार केला तरी यातील उणिव समोर येईल. कारण गेल्या निवडणूकीपेक्षा राज्यातील वातावरण निश्चित वेगळं होतं हे राज्यातील सर्व जाणकारांनी स्पष्ट केलं असताना विद्यापीठाच्या जनमत चाचणीचे आकडे हे धक्कादायक आणि काहीसे अवास्तव वाटताहेत. त्यातही विद्यापीठाच्या सर्व्हेमध्ये अचूकता दिसत नाहीय. उदा. भाजपसाठी महाराष्ट्रात १७ ते २३ अशी आकडेवारी विद्यापीठानं दिलीय. मात्र, एकतर १७ आकडा द्यावा, किंवा तेवीस.. कारण या दोन्ही आकड्यांमधील तफावत ही सहाची आहे. एवढी तफावत सर्वेक्षणात असेल तर तो कसा ग्राह्य धरायचा. हीच बाब अन्य पक्षांच्याबाबतीतही आहे. शिवसेना १६ ते २१, कॉंग्रेस १ ते ६, राष्ट्रवादी कॉंग्रेस ३ ते ९, अशी आकडेवारी दिलीय. त्यामुळं विद्यापीठानं त्यांच्या मॉडेलनूसार मांडलेली आकडेवारी अतिशय मोघम पद्धतीची आहे.

Updated : 22 May 2019 9:26 AM GMT
Next Story
Share it
Top