पुनाळेकर, भावेला 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडीत
Max Maharashtra | 27 May 2019 5:00 PM IST
X
X
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या सनातनच्या संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना पुणे सत्र न्यायालयानं १ जूनपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सीबीआयनं शनिवारी या दोघांना मुंबईतून अटक करण्यात आली होती.
दाभोलकर हत्ये प्रकरणी पुरावे नष्ट करणं आणि आरोपींना मार्गदर्शन करणे, असे आरोप संजीव पुनाळेकरवर आहेत. तर आरोपींना दाभोलकरांची ओळख करून देणे, घटनास्थळाची रेकी करणे, असे आरोप भावे याच्यावर आहेत. न्यायालयात पुनाळेकर म्हणाले, की कर्नाटक पोलिसांनी कळसकरनं दिलेल्या जबाबाच्या आधारानं मला अटक केली आहे. प्रत्यक्षात मी आरोपींचा वकील असताना, मला अटक करणं चुकीचं आहे. भावे देखील माझे सहायक आहेत. सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी म्हणाले की, दाभोलकरांच्या हत्येसाठी आरोपींनी मोटरसायकल वापरली होती. तिच्या तपासासाठी भावेची चौकशी करण्याची गरज आहे. पुनाळेकरने हत्या करण्यासाठी वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.
Updated : 27 May 2019 5:00 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire