Top
Home > मॅक्स रिपोर्ट > पुजाराचे शतक; दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद ८

पुजाराचे शतक; दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद ८

पुजाराचे शतक; दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया बिनबाद ८
X

चेतेश्वर पुजाराने आपल्या कसोटी कारकिर्दीतील शानदार १७ वे शतक झळकावले. १० चौकार लगावत पुजाराने ३१९ चेंडूंचा सामना करून शतक ठोकले. पुजाराचे या मालिकेतील दुसरे शतक असून त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकले.

चेतेश्वर पुजारा (१०६) आणि कर्णधार विराट कोहली (८२) यांच्या भागीदारीच्या बळावर भारताने तिसऱ्या कसोटीमध्ये धावांचा डोंगर रचला आहे. तिसऱ्या कसोटीवर पकड मिळवत भारताने दुसऱ्या दिवशी ७ बाद ४४३ धावांवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने खेळ संपेपर्यंत सावधानतेचा पवित्रा घेत बिनबाद ८ धावा केल्या.

Updated : 27 Dec 2018 12:12 PM GMT
Next Story
Share it
Top