Home > मॅक्स किसान > पंतप्रधान साहेब तर कांदा उत्पादक शेतकरी वाचला असता...

पंतप्रधान साहेब तर कांदा उत्पादक शेतकरी वाचला असता...

पंतप्रधान साहेब तर कांदा उत्पादक शेतकरी वाचला असता...
X

सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर योग्य भाव मिळत नसल्याने रडण्याची वेळ आहे. काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याने कांद्याला योग्य दर न मिळाल्याने त्या दरात कांदा विकून ते पैसे पंतप्रधान मोदींना मनिऑर्डर केले होते. आज कांद्याला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कांद्यातून मिळालेले पैसे मनी ऑर्डर करत आहेत. मात्र, स्वाभिमानी पक्षाचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासंदर्भात" पत्र लिहिले होते. मात्र, या पत्राकडे पंतप्रधान कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

काय आहे या पत्रात ?

या पत्रात राजू शेट्टी यांनी असं म्हणलं आहे की, "यहां यह विदित हो की प्याज जल्दी ख़राब होने वाली फसल है, जिसे लम्बे समय तक संरक्षित भी नहीं किया जा सकता और न्यूनतम समर्थन मूल्य की सूचि में भी इसको स्थान नहीं दिया गया है, जिसके कारन स्थिति अनियंत्रित होती जा रही है | पिछले कुछ वर्षो में राष्ट्रिय बागवानी अनुसंधान एंव विकास प्रतिष्ठान के डाटा के मुताबिक किसानोंने अपनी एक तिहाई से ज्यादा प्याज की फसल लगत से बढ़ी है जिसमे बीज, उवर्रक और किटक नाशकों की मूल्य वृद्धि कई गुना तक हुई है जिस पर डीजल की बढ़ोतरी भिओ है वर्त्तमान मै महाराष्ट्र के नाशिक जिले में प्याज का लगत मूल्य १,००० रुपये से १,२०० रुपये है जो की वर्ष दर वर्ष बढ़ रहा है | जिस पर किसान को उसकी फसल का मूल्य ५०० रुपये ५५० रुपये प्रति क्विंटल मिल रहा है | ये जाहिर तौर पर आधा ही है | केंद्र सर्कार का किसान को उसकी फसल का दोगुना मूल्य देना का आश्वासन जमीनी तौर पर लागु करने के संदर्भा में मेरा यह मानना है की सरकार को इस दिशा में ठोस कदम उठाने होंगे जिसमे किसानोंके हितों को सर्वो पारी रखा जाये |

खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांसोबतच केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंह, केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू तसेच केंद्रीय खाद्य वितरण मंत्री राम विलास पासवान यांना देखील पत्रं लिहिली होती. मात्र या वर सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कांदा उत्पादकांची ही स्थिती अशीच राहिली तर येत्या काळात हाच कांदा सरकारला शुद्धीवर आणेल एवढं मात्र नक्की.

Updated : 13 Dec 2018 10:08 AM GMT
Next Story
Share it
Top